पायलटने प्रसंगावधान दाखवत विमान पुन्हा स्थिरावत सुरक्षितपणे लखनऊला उतरवलं. दरम्यान, नवी दिल्ली-पुणे एअर इंडियाच्या विमानाला तासाभराचा नाही, तब्बल ३ तास विलंब झाल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.

पणजी : अहमदाबादजवळ एअर इंडियाचे विमान कोसळून २७५ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेला चार दिवस उलटले असतानाच, गोव्यातूनही थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. मोपा विमानतळावरून उड्डाण घेताच इंडिगोच्या विमानाचा तोल गेल्याने विमान थेट जमिनीकडे झुकू लागले. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे क्षणभर प्रवाशांच्या अंगावर काटा उभा राहिला; मात्र पायलटने प्रसंगावधान दाखवत विमान पुन्हा स्थिरावत सुरक्षितपणे लखनऊला उतरवलं. दरम्यान, नवी दिल्ली-पुणे एअर इंडियाच्या विमानाला तासाभराचा नाही, तब्बल ३ तास विलंब झाल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.

लखनऊपर्यंतचा प्रवास, जीव मुठीत घेऊन!

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोची फ्लाइट ६ई-६८११ ने रविवारी दुपारी ३.४८ वाजता मोपा विमानतळावरून लखनऊसाठी उड्डाण घेतले. काही क्षणांतच विमानाचा संतुलन बिघडल्यामुळे ते वेगाने खाली झुकू लागले. ही बाब लक्षात येताच विमानात एकच खळबळ उडाली. काही प्रवासी घाबरून ओरडू लागले. अनेकांनी प्रार्थना सुरू केल्या.

या थरारक क्षणी वैमानिकाने अत्यंत धैर्य व तात्काळ निर्णयक्षमतेने विमानावर नियंत्रण मिळवत ते पुन्हा हवेत स्थिरावले. सुमारे अडीच तासांचा लखनऊपर्यंतचा प्रवास प्रवाशांनी अक्षरशः जीव मुठीत धरून पूर्ण केला. अमौसी विमानतळावर विमान सुरक्षित उतरल्यावर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.

प्रवाशांकडून चौकशीची मागणी

घटनेनंतर प्रवाशांनी वैमानिकाच्या भूमिकेचे कौतुक करत, विमानाच्या तांत्रिक स्थितीबाबत सखोल चौकशीची मागणी केली आहे. नेमकं काय बिघाड झाला होता? विमानाचा तोल का गेला? अशा प्रश्नांची उत्तरं मिळावीत, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

अहमदाबाद दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वाढलेली भीती

अहमदाबाद येथील एअर इंडिया दुर्घटनेनंतर संपूर्ण देशात विमान प्रवासाबाबत भीतीचं वातावरण पसरलं आहे. अशा वेळी गोव्यात घडलेली ही घटना अधिकच धडकी भरवणारी ठरली. १७२ प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाल्यानंतर विमानांच्या देखभाल व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

बालीजवळ ज्वालामुखीचा स्फोट; दिल्लीहून बालीकडे जाणारी एअर इंडिया फ्लाईट वळवण्यात आली परत दिल्लीला

नवी दिल्ली - दिल्लीहून बालीकडे जाणारी एअर इंडियाची AI2145 ही फ्लाईट बुधवारी (दि. १८ जून) सुरक्षा कारणास्तव परत दिल्लीला वळवण्यात आली. बाली विमानतळाजवळ ज्वालामुखीच्या स्फोटाच्या वृत्तांनंतर हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली आहे. सदर विमानाने सुरक्षित लँडिंग केली असून सर्व प्रवाशांना सुखरूपपणे खाली उतरवण्यात आले आहे.

एअर इंडियाने या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "AI2145 ही फ्लाईट १८ जून २०२५ रोजी दिल्लीहून बालीसाठी निघाली होती. बाली विमानतळाजवळ ज्वालामुखीचा स्फोट झाल्याची माहिती मिळताच, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विमान दिल्लीकडे परत वळवण्यात आले. विमान सुरक्षितपणे दिल्लीला उतरले असून सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आहे."

यामुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवाशांना दिल्लीमध्ये हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, ज्यांना हवे असेल त्यांना पूर्ण परतावा देण्याचा किंवा विनामूल्य री-शेड्युलिंगचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे, असेही कंपनीने स्पष्ट केले.

१२ ते १७ जूनदरम्यान एअर इंडियाचे ८३ विमाने रद्द; ६६ बोईंग ७८७ उड्डाणे रद्द

दरम्यान, १२ ते १७ जून २०२५ या कालावधीत एअर इंडियाच्या वाइड-बॉडी ऑपरेशन्समधील एकूण ८३ उड्डाणे रद्द करण्यात आली असल्याची माहिती डीजीसीए (DGCA) ने मंगळवारी दिली. यामध्ये ६६ बोईंग ७८७ विमानांची उड्डाणे होती.

डीजीसीएने यासंदर्भात एअर इंडिया लिमिटेड आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय बैठक घेतली. सध्या एअर इंडिया गट देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा एकूण दैनंदिन १,००० हून अधिक उड्डाणांची सेवा देत आहे.

डीजीसीएच्या प्रसिद्धिपत्रकात असेही नमूद करण्यात आले की, या बैठकीत एकूण सात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असून त्यात नियामक अनुपालन, विमानांच्या वेळेचे पालन आणि ऑपरेशनल विश्वसनीयता वाढवण्यावर भर देण्यात आला.

इराणी हवाई हद्द बंद: अनेक फ्लाईट्सवरील परिणाम

शिवाय, अलीकडील काळात इराणी हवाई हद्द बंद झाल्याचा मोठा परिणाम अनेक आंतरराष्ट्रीय विमानांवर झाला आहे. यामुळे अनेक फ्लाईट्स वळवाव्या लागल्या आहेत, तसेच अनेक उड्डाणांना उशीर किंवा रद्द करण्याची वेळ आली आहे. डीजीसीएने या परिस्थितीचाही सविस्तर आढावा घेतल्याचे सांगितले.

सुप्रिया सुळेंना करावा लागला अडचणींचा सामना

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या तांत्रिक अडचणी आणि वेळापत्रकातील अनियमितता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. याचाच फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही बसला. दिल्लीहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI-2971 या विमानाला तब्बल ३ तासांचा विलंब झाल्यामुळे सुळे यांनी थेट सोशल मीडियावर (एक्स) संताप व्यक्त केला.

प्रवाशांना माहिती नाही, संवाद नाही, मदत तर दूरच!

खासदार सुळे यांनी सांगितले की, विलंब झाल्याचे कोणतेही ठोस कारण कर्मचाऱ्यांकडून देण्यात आले नाही. प्रवाशांना कोणतीही माहिती दिली गेली नाही, ना कुणी संपर्क साधला, ना मार्गदर्शन केले. ही सेवा अत्यंत निराशाजनक आणि अपमानास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.

केंद्रीय मंत्र्यांकडे हस्तक्षेपाची मागणी

या प्रकरणात केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के. राममोहन नायडू यांनी त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी सुळे यांनी केली. त्यांच्या विनंतीनंतर नायडू यांनी एअर इंडिया व विमानतळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून, सर्व प्रवाशांच्या अडचणी तातडीने दूर करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी ‘एक्स’ पोस्टद्वारे कळवले.

"ही उदासीनता अस्वीकार्य!" - सुळे

"एअर इंडिया ही सरकारी कंपनी असूनही प्रवाशांशी वागणूक देताना गांभीर्याची कमतरता दिसते. वारंवार होणारे विलंब, माहितीअभावी प्रवाशांची होणारी ससेहोलपट ही अतिशय गंभीर बाब आहे. ही उदासीनता पूर्णतः अस्वीकार्य आहे," असं स्पष्ट मत खासदार सुळे यांनी मांडलं.

हवामानामुळे विलंब, कंपनीचं स्पष्टीकरण

दरम्यान, एअर इंडियाने या विलंबामागे दिल्लीतील खराब हवामान कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण दिले. विमानतळावर निघण्यापूर्वी प्रवाशांनी उड्डाणविषयक माहिती तपासून घ्यावी, असे आवाहन कंपनीने दोन तास आधीच ‘एक्स’वर पोस्ट करून केले होते.नवी दिल्ली : एअर इंडियाच्या तांत्रिक अडचणी आणि वेळापत्रकातील अनियमितता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. याचाच फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही बसला. दिल्लीहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI-2971 या विमानाला तब्बल ३ तासांचा विलंब झाल्यामुळे सुळे यांनी थेट सोशल मीडियावर (एक्स) संताप व्यक्त केला.

प्रवाशांना माहिती नाही, संवाद नाही, मदत तर दूरच!

खासदार सुळे यांनी सांगितले की, विलंब झाल्याचे कोणतेही ठोस कारण कर्मचाऱ्यांकडून देण्यात आले नाही. प्रवाशांना कोणतीही माहिती दिली गेली नाही, ना कुणी संपर्क साधला, ना मार्गदर्शन केले. ही सेवा अत्यंत निराशाजनक आणि अपमानास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.

केंद्रीय मंत्र्यांकडे हस्तक्षेपाची मागणी

या प्रकरणात केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के. राममोहन नायडू यांनी त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी सुळे यांनी केली. त्यांच्या विनंतीनंतर नायडू यांनी एअर इंडिया व विमानतळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून, सर्व प्रवाशांच्या अडचणी तातडीने दूर करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी ‘एक्स’ पोस्टद्वारे कळवले.

"ही उदासीनता अस्वीकार्य!" - सुळे

"एअर इंडिया ही सरकारी कंपनी असूनही प्रवाशांशी वागणूक देताना गांभीर्याची कमतरता दिसते. वारंवार होणारे विलंब, माहितीअभावी प्रवाशांची होणारी ससेहोलपट ही अतिशय गंभीर बाब आहे. ही उदासीनता पूर्णतः अस्वीकार्य आहे," असं स्पष्ट मत खासदार सुळे यांनी मांडलं.

हवामानामुळे विलंब, कंपनीचं स्पष्टीकरण

दरम्यान, एअर इंडियाने या विलंबामागे दिल्लीतील खराब हवामान कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण दिले. विमानतळावर निघण्यापूर्वी प्रवाशांनी उड्डाणविषयक माहिती तपासून घ्यावी, असे आवाहन कंपनीने दोन तास आधीच ‘एक्स’वर पोस्ट करून केले होते.