MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Rain Alert: राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! 28 जिल्ह्यांना यलो, काहींना ऑरेंज अलर्ट, ऐन गणेशोत्सवातच पावसाचे धुमशान

Maharashtra Rain Alert: राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! 28 जिल्ह्यांना यलो, काहींना ऑरेंज अलर्ट, ऐन गणेशोत्सवातच पावसाचे धुमशान

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने २८ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला असून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Aug 28 2025, 09:58 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
Image Credit : Getty

मुंबई : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा पावसाचे संकट घोंगावत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक भागांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील 28 जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Thunderstorms accompanied with lightning ,gusty winds 30-40kmph and heavy to very heavy rainfall very likely to occur at isolated places in ghat areas of North Madhya Maharashtra.

तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/OQ4vvDD6wj

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 28, 2025

27
Image Credit : X

कोकण आणि मुंबई परिसर

मुंबई: शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता.

पालघर, ठाणे: विजांसह पावसाचा इशारा; यलो अलर्ट.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग: मुसळधार पावसाची शक्यता; यलो अलर्ट.

Related Articles

Related image1
Lalbaugcha Raja 2025: डॉलर्सचा हार, क्रिकेट बॅट, कोट्यवधींची देणगी; लालबागच्या राजाची पहिली दानपेटी उघडली, पाहा VIDEO
Related image2
Cotton Import: कापूस उत्पादकांचं संकट वाढलं, शुल्कमुक्त आयातीची मुदत तीन महिन्यांनी वाढवली
37
Image Credit : X

पश्चिम महाराष्ट्र व घाटमाथा

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर: हलका ते मध्यम पाऊस.

घाटमाथा (पुणे, कोल्हापूर, सातारा): अतिवृष्टीची शक्यता; ऑरेंज अलर्ट.

47
Image Credit : Asianet News

मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड: वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस; यलो अलर्ट.

लातूर, धाराशिव: हलका ते मध्यम पाऊस.

57
Image Credit : Getty

उत्तर महाराष्ट्र

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर: विजांसह पावसाचा अंदाज; यलो अलर्ट.

नाशिक घाटमाथा: मुसळधार पाऊस होण्याची शक्यता.

67
Image Credit : Getty

विदर्भ

अकोला, अमरावती: वादळी वारे आणि विजांसह मुसळधार पावसाचा इशारा.

भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ: विजांसह वादळी वाऱ्याचा अंदाज; यलो अलर्ट.

77
Image Credit : ANI

नागरिकांसाठी सूचना

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने 29 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी.

अनावश्यक प्रवास टाळा.

विजांच्या कडकडाटात घराबाहेर जाणे टाळा.

हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करा.

स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.

राज्य सरकारने देखील जिल्हा प्रशासनांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवर टँकर अपघातानंतरही कोंडी कायम; 32 तासांचा हाहाकार, सरकारकडून चौकशीचे आदेश
Recommended image2
Ration Card: रेशन कार्डमधून नाव कट झालंय? टेन्शन सोडा, ५ मिनिटांत घरबसल्या करा नवीन नोंदणी!
Recommended image3
Solapur ZP Election : मोहोळमध्ये शिंदेंचं धक्कादायक वक्तव्य; शिवसेनेच्या चिन्हावरील उमेदवारालाच मत देऊ नका!
Recommended image4
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत धक्कादायक प्रकार; नंदुरबारमध्ये 710 पुरुषांचे अर्ज बाद
Recommended image5
Mumbai Pune Expressway : 32 तासांनंतर अपघातग्रस्त गॅस टँकर हटवण्यात यश; मुंबई–पुणे महामार्गावरील वाहतूक सुरळीत
Related Stories
Recommended image1
Lalbaugcha Raja 2025: डॉलर्सचा हार, क्रिकेट बॅट, कोट्यवधींची देणगी; लालबागच्या राजाची पहिली दानपेटी उघडली, पाहा VIDEO
Recommended image2
Cotton Import: कापूस उत्पादकांचं संकट वाढलं, शुल्कमुक्त आयातीची मुदत तीन महिन्यांनी वाढवली
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved