माजी आमदाराचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का

| Published : Jul 26 2024, 02:38 PM IST

Uddhav Thackeray

सार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. गोंदियाचे माजी आमदार आणि भाजप नेते रमेश कुठे यांनी उद्धव ठाकरे गटात (शिवसेना यूबीटी) प्रवेश केला आहे. रमेश कुठे यांनी 2018 मध्ये शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. गोंदियाचे माजी आमदार आणि भाजप नेते रमेश कुठे यांनी उद्धव ठाकरे गटात (शिवसेना यूबीटी) प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी पक्षात प्रवेश केला. 2018 मध्ये रमेश कुठे यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

महाराष्ट्रात भाजपला धक्का
विधानसभा निवडणुकीपूर्वी रमेश कुठे हे 1995 आणि 1999 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर दोनदा विजयी झाले होते. यानंतर ते काही काळ राजकारणापासून दूर राहिले. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातील भाजप नेत्यांवर नाराज होते. दरम्यान, त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये जाणार की नाही अशी चर्चा होती. मात्र त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे.

महायुती सोडून अनेक नेते करणार पक्षांतर - 
महायुती सोडून अनेक नेते पक्षांतर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. महायुतीमध्ये एका विधानसभा मतदारसंघात भांडण असल्यास तेथील दुसऱ्या पक्षातील नेत्याला विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आला. पण जागांची मर्यादा असल्यामुळे सर्वच ठिकाणी हा निर्णय लागू झाला नाही, त्यामुळे अनेक नेते महायुतीला रामराम करणार असल्याचे लक्षात आले आहे. त्याचीच सुरुवात म्हणून रमेश कुठे यांनी परत एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांना पक्षाकडून विधानसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर केले जाईल अशी अपेक्षा आहे. 
आणखी वाचा - 
कारगिल विजय दिवस: पंतप्रधान मोदी यांनी देशासाठी अभिमानाचा दिवस असल्याचे म्हटले
पंतप्रधान मोदी कारगिल शहीदांना श्रद्धांजली वाहून प्रकल्पाची करणार पायाभरणी