सार

छत्रपती संभाजीनगर येथे बुधवारी पहाटे एका कापडाच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत दुकानाच्या वरच्या बाजूस राहणाऱ्या एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Chhatrapati Sambhajinagar Fire : छत्रपती संभाजीनगर येथील छावणी परिसरातील कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची दुर्घटना बुधवारी (3 मार्च) पहाटे चार वाजता घडली. या दुर्गघटनेत सात जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे.

नक्की काय घडले?
छत्रपती संभाजीनगर येथील छावणी परिसरातील जैन मंदिराजवळ असलेल्या एका तीन मजली इमारतीला आग लागली गेली. या दुर्घटनेत दुकानावर राहणाऱ्या परिवारातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळतात तातडीने अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम केले.

या घटनेबद्दल अधिक माहिती देत पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी म्हटले की, पहाटे चार वाजताच्या सुमारास आग लागल्याची दुर्घटना घडली. आग लागल्यानंतर ती इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचू शकली नाही. पण प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. आग लागण्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. सध्या पुढील तपास सुरू असल्याचेही लोहिया यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : 

राज्यात वाढत्या तापमानामुळे आरोग्य विभागाने दिला सतर्कतेचा इशारा...

भिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग ;सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही

मासिक पाळीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या? नेमकी प्रकरण काय ?