सार

भिवंडी परिसरातील एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागाली होती. हि घटना शनिवारी रात्री घडली असून आग पूर्णतः विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

ठाणे : भिवंडी परिसरातील एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागाली होती. हि घटना शनिवारी रात्री घडली असून आग पूर्णतः विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. तसेच या संपूर्ण आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नसल्याची माहिती अग्निशमनदलाचे अधिकारी शैलेंद्र शिंदे यांनी दिली.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

रात्री साडेअकरा वाजता आम्हाला आग लागल्याचा फोन आला होता. आम्ही तातडीने घटनास्थळी पोहोचलो असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही," असे शिंदे यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की., या रद्दीच्या गोदामात लाकडी प्लाय, प्लॅस्टिकच्या वस्तू, कागद आणि पुठ्ठा यासह मोठ्या प्रमाणात रद्दी ठेवण्यात आल्या होत्या. सुमारे 15-20 गोदामे जळून राख झाली आहेत, असे अग्निशमन अधिकारी शैलेंद्र शिंदे सांगितले.,

तसेच गोदाम लागत असलेल्या काही चारचाकी गाड्यांनाही आग लागली असून त्या जाळून खाक झाल्या आहेत. मात्र अद्याप हि आग कशामुळे लागली याचे कारण समजलेले नाही. आग विझवण्याचे काम सुरू असले तरी पाण्याअभावी आग आटोक्यात आणण्यात कर्मचाऱ्यांना अडचणी येत होत्या.तसेच, पाण्याचा स्त्रोत आढळल्यास आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाच ते सहा तास लागण्याची शक्यता अग्निशमन अधिकारी शैलेंद्र शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा :

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना मिळाले तिकीट

काँग्रेस आमदार शिवशंकरप्पा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सायना नेहवालने पोस्ट केले ट्विट, मी एक मुलगी आहे मी लढू शकते