सार
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण ,राजकीय वातावरण तर तापताना दिसत आहे.मात्र दुसरीकडे कमी पावामुळे यंदा उन्हाळा चांगल्याच प्रमाणात जाणवत असून राज्यात आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.उष्माघातामुळे ३३ जणांना रुग्णालयात दाखल केले आहे.
मुंबई : देशभरात गेल्या वर्षात पावसाचे प्रमाण कमी होते. काही भागात सरासरीपेक्षा देखील कमी पावसाची नोंद झाली होती. तसेच बदलते हवामान याचा देखील फटका पावसावर झाला आणि सध्या फेब्रुवारीपासूनच कडक उन्हाच्या झळा लागायला सुरूवात झाली. यंदा वाढत्या तापमानाचा फटका विदर्भातही छगनलाच जाणवत आहे. मार्च महिन्यातच तापमानाचा पारा ४० पर्यंत पोहोचल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यात आरोग्यविभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
यंदा मार्च महिन्यातच उष्मघातामुळे ३३ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यामुळे आरोग्य विभागाने उष्माघाताची दखल घेत , काळजी घेण्याबाबतचा कृती आराखडा तयार केला असून याबाबतची माहिती राज्यातील विविध महापालिका आणि विविध यंत्रणांना पाठवली आहे.
या आराखड्यात लोकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत जनजागृती कार्यक्रमही हाती घेण्यात आल्याचे नमूद केले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाशल्यचिकित्सकांच्या अखत्यारितील आरोग्य यंत्रणांनी व्यापक सर्वेक्षण करणे तसेच उष्णतेसदर्भातील आजारांचे सर्वेक्षण करून ते अःवर पोर्टलवर टाकायचे आहे. जेणे करून त्याचा आढावा घेताना ज्या भागात उष्मघाताचे प्रमाण अधिक असेल त्याठिकणी सुविधा पुरविणे सोपे होईल.
उष्माघाताची लक्षणं:
- चक्कर येणं, उल्ट्या होणं, मळमळ होणं.
- शरीराचं तापमान जास्त वाढणं.
- पोटात कळ येणं.
- शरीरातील पाणी कमी होणं.
उष्णतेच्या लाटेपासून स्वतःला कसं वाचवाल?
- उष्णतेची लाट असताना दुपारी 12 ते 4 या काळात घराच्या बाहेर जाणं टाळावं. अगदी अत्यावश्यक असल्यास घराबाहेर पडावं.
- निघताना गडद रंगाचे कपडे घालू नये. टोपी, गॉगल, रुमाल यांचा वापर करावा. कानाला गरम वारं लागणार नाही याची दक्षता घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे.
- भरपूर पाणी प्या आणि सोबतही पुरेसं पाणी ठेवा.
- उन्हातून थेट कुलर किंवा एसीत जाणं टाळावं.
- रस्त्यावरचा फळांचा ज्यूस पिणं टाळावं.
आणखी वाचा :
सातत्याने पोट बिघडतेय? असू शकतात या Cancer ची लक्षणे, वेळीच सावध व्हा