पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर! जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे जाणून घ्या

| Published : Jan 08 2025, 05:08 PM IST / Updated: Jan 08 2025, 05:17 PM IST

Bibi Ka Makbara
पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर! जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे जाणून घ्या
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध असलेला जिल्हा आहे. येथे अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत जी स्थानिक तसेच परदेशी पर्यटकांना आकर्षित करतात.

छत्रपती संभाजीनगर:  नवीन वर्षात आणि हिवाळ्यात आपल्यापैकी अनेकांना फिरायला जाण्याची इच्छा असते. परंतु कोठे जावे हा प्रश्न आपल्याला पडतो. या लेखातुन आम्ही तुम्हाला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांविषयी माहिती सांगणार आहोत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध असलेला भाग आहे. येथे अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत जी स्थानिक तसेच परदेशी पर्यटकांना आकर्षित करतात.

१. अजिंठा लेणी

अजिंठा लेणी जगप्रसिद्ध आहे. येथे दररोज हजारो देशी-विदेशी पर्यटक भेट देत असतात. हे ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे. येथील लेण्यांमध्ये बौद्ध संस्कृतीवरील प्राचीन शिल्पकला आणि भित्तिचित्रे आहेत. अजिंठा लेण्यामध्ये एकुण २९ लेण्यांचा समावेश असून, या लेण्या दुसऱ्या शतकापासून अस्तित्वात आहेत असे सांगितले जाते.

२. वेरूळ लेणी

वेरूळ लेणी देखील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे दररोज देशी-विदेशी पर्यटक भेट देत असतात. हे पर्यटन स्थळ युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे. येथे हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मातील ३४ लेण्या आहेत. वेरूळ लेण्यांमधील प्रसिद्ध कैलास मंदिर हे एक अखंड दगडात कोरलेले मंदिर आहे. हे मंदिर पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे.

३. घृष्णेश्वर मंदिर

घृष्णेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदीर आहे. येथे देशभरातून भाविक येत असतात. हिंदू भाविकांसाठी हे पवित्र ठिकाण आहे. हे मंदीर वेरूळ लेण्यांच्या जवळच आहे.

४.खुलताबाद

खुलताबाद हे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व असलेले ठिकाण आहे. येथील भद्रा मारोती मंदीर प्रसिद्ध आहे. तसेच या शहरात औरंगजेबाच्या समाधीचे स्थान आहे. येथे सूफी संतांच्या अनेक समाध्या आहेत. हे ठिकाण वेरूळ लेणीपासून जवळच आहे.

५. म्हैसमाळ

म्हैसमाळ हे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे.

६. बिबी का मकबरा

बिबी का मकबरा हे ताजमहालच्या धर्तीवर बांधलेले स्मारक आहे. हे पर्यटन स्थळ छत्रपती संभाजीनगर शहरात आहे. औरंगजेबाचा मुलगा आजम शाहने आपल्या आई दिलरस बानू बेगमसाठी हे स्मारक बांधले. हा मकबरा उत्कृष्ट मुघल स्थापत्यशैलीचे उदाहरण आहे.

७. देवगिरी किल्ला (दौलताबाद किल्ला)

देवगिरी किल्ला एक भव्य आणि भव्य आणि एक भक्कम आणि ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला १२ व्या शतकात यादव राजांनी बांधलेला आहे. किल्ला २०० मीटर उंच टेकडीवर वसलेला असून संरक्षक तटबंदी प्रसिद्ध आहे. दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात. हे पर्यटन स्थळ छत्रपती संभाजीनगर शहराजवळ आहे.

८. पाणचक्की

हे पर्यटन स्थळ छत्रपती संभाजीनगर शहरात आहे. ही ऐतिहासिक पाणचक्की पाण्याच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून चालते. हे स्थळ मुघल स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. पाणचक्कीशेजारील मस्जिद आणि दर्गाही पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

९. सिद्धार्थ गार्डन आणि प्राणिसंग्रहालय

सिद्धार्थ गार्डन आणि प्राणिसंग्रहालय हे छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध गार्डन आहे. प्राणिसंग्रहालयामध्ये वाघ, सिंह, हरण, आणि पक्षी पाहायला मिळतात. हे ठिकाण कुटुंबासाठी आणि मुलांसाठी आकर्षण आहे.

१०. गौताळा अभयारण्य

हे अभयारण्य वन्यजीव प्रेमींसाठी आदर्श ठिकाण आहे. हरण, भेकर, मोर आणि विविध पक्षीप्रजाती येथे पाहायला मिळतात. हे अभयारण्य निसर्गरम्य वातावरण आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटक गर्दी करतात.

११. पितळखोरा लेणी

अजिंठा-वेरूळ लेण्यांप्रमाणेच ही प्राचीन बौद्ध लेणी आहे. ही लेणी प्राचीन शिल्पकला आणि वास्तुशिल्पाचे उदाहरण आहे.

१२. जायकवाडी धरण (नाथसागर)

हे धरण पैठण शहराजवळ आहे. पाणथळ भागासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी येथे पाहायला मिळतात. निसर्गप्रेमींसाठी आणि पक्षी निरीक्षकांसाठी उत्तम स्थळ.

१३. पैठण

पैठण हे ऐतिहासिक शहर आहे. हे शहर पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण संत एकनाथ महाराजांची कर्मभूमि आहे. येथे संत एकनाथांची समाधी आहे. येथील नाथसागर जलाशय आणि संत ज्ञानेश्वर उद्यान प्रमुख आकर्षणे आहेत.