Dombivli MIDC Blast: डोंबिवली एमआयडीसीतील एकूण मृतांचा आकडा 11 वर, अजूनही शोधकार्य सुरूच

| Published : May 24 2024, 10:25 AM IST / Updated: May 24 2024, 10:27 AM IST

डोंबिवली स्फोट

सार

डोंबिवली एमआयडीसीच्या फेज दोनमध्ये मोठा स्फोट झाला असून यामध्ये अकरा जणांचा अद्याप मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. येथे अजूनही बचावकार्य चालू असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

डोंबिवली एमआयडीसीच्या फेज दोनमध्ये मोठा अपघात झाला आहे. बॉयलरचा स्फोट झाल्यामुळे सगळं डोंबिवली शहर हादरून गेले आहे. येथे सध्या बचावकार्य चालू असून अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून हे बचावकार्य राबवले जात आहे. या शोधकार्यादरम्यान येथे तीन मृतदेह सापडले असून एक मृतदेह केजी कंपनीच्या केमिकल्स कंपनीच्या आवारात सापडला आहे. 

मृतदेहांची संख्या गेली 11 पर्यंत 
मृतदेहांची संख्या करून 11 पर्यंत गेली आहे. एमआयडिसीतील अमुदान कंपनीत गुरुवारी दुपारी बॉयलरचा स्फोट होऊन भीषण स्फोट झाला होता. येथे झालेला स्फोट हा तीन किलोमीटरपर्यंत हादरे बसले आहेत. त्यामुळे या परिसरातील अनेक कंपन्यांचे नुकसान झाले असून शेजारील कंपन्यांच्या काचा फुटल्या आहेत. शेजारच्या इमारतींचे तुकडे गाडीवर पडून त्यांचे नुकसान झाले आहे.

एमआयडीसीच्या आवारात भकास वातावरण - 
अग्निशमन दलाने येथे बचाव मोहीम मोठ्या प्रमाणावर चालवली असून या ठिकाणी एनडीआरएफचे जवान वेगाने मोहीम चालवत असल्याचे सांगण्यात आले आहे. येथे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मृतदेह शोधण्यात येत असून तीन मृतदेहांची ओळख अखेर पटली आहे. स्फोट झाल्यानंतर एमआयडीसी परिसरात सगळीकडे धुराचे साम्राज्य असून त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. 

कंपनी मालकाविरोधात केला गुन्हा दाखल - 
अमुदान कंपनीतील बॉयलरचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली होती. या बॉयलरसाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी स्फोट झालेल्या बॉयलरला कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी कंपनीचे मालक प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
आणखी वाचा - 
अल्पवयीन मुलगा नाहीतर ड्रायव्हर चालवत होता गाडी, पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या मित्रांनी केला दावा