- Home
- Maharashtra
- BIG UPDATE : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात मोठी वाढ, राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 10 महत्त्वाचे निर्णय
BIG UPDATE : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात मोठी वाढ, राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 10 महत्त्वाचे निर्णय
- FB
- TW
- Linkdin
Maharashtra Cabinet Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (14 फेब्रुवारी) मंत्रालयामध्ये पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
या बैठकीमध्ये कोणकोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत, जाणून घेऊया…
मंत्रिमंडळ बैठकीतील 10 महत्त्वपूर्ण निर्णय :
- मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी 7 हजार किमी रस्ते व पूल बांधणार
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी 7 हजार किमी रस्ते व पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या टप्पा-2 मध्ये 10 हजार किमी लांबीचे रस्त्यांचे उद्दिष्ट आहे. यापैकी 7 हजार किमी लांबीचे रस्ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये बांधायचे ते ठरले आहे. 3 हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे सविस्तर प्रकल्प अहवालास मान्यता देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या टप्प्यात संशोधन व विकासासाठी आणखी 7 हजार किमी लांबीच्या रस्त्यांचा दर्जा वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या टप्प्यात महानगरपालिका, साखर कारखाने, औष्णिक विद्युत केंद्र, वाळू आणि खडीच्या खदानी, मोठ्या नद्या, औद्योगिक परिसरापासून १० कि.मी.च्या आणि नगरपालिका, नगरपरिषदा, छावणी बोर्ड हद्दीपासून पाच किमीच्या मर्यादेतल्या रस्त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी निवड करण्यात येईल. रस्त्यांची दर्जोन्नती केलेल्या मात्र पुलांअभावी दळणवळण होत नसलेल्या ठिकाणी पूल उभारण्यात येतील.
- ऑनलाइन पद्धतीने वाळू, रेती पुरवण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरण. 'ना नफा, ना तोटा' तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरीव वाढ, आता मिळणार दरमहा 18 हजार
राज्यातील शासकीय व अनुदानित वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी महाविद्यालयातील आंतरवासिता प्रशिक्षणार्थींच्या (इंटर्नशिप) विद्यावेतनात वाढ करून ते दरमहा 18 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच परदेशातून वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना इंटर्नशिप कालावधीसाठी 18 हजार रुपये विद्यावेतन देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.
या विद्यार्थ्यांना पूर्वी 11 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येत होते ते आता फेब्रुवारी 2024पासून दरमहा 18 हजार रुपये देण्यात येईल. तसेच परदेशातून वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना (Foreign Medical Graduates-FMGs) आंतरवासिता प्रशिक्षण कालावधीमध्ये हेच विद्यावेतन देण्याचा निर्णय झाला आहे.
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी मान्य. आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा.
- उच्च तंत्रज्ञानाच्या अतिविशाल उद्योगांना प्रोत्साहन देणार. राज्यातील कमी विकसित भागांना फायदा
- सायन कोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या 25 इमारतींचा पुनर्विकास करणार. म्हाडा करणार विकास
- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना
- राज्यात जळगाव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार , गोंदिया या सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय
- औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणार. 50 टक्के मुद्रांक शुल्क सवलत
- भुदरगड तालुक्यात नवीन समाजकार्य महाविद्यालय
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
मंत्रिमंडळ बैठकीतील… pic.twitter.com/SYJEZPOznl— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 14, 2024
आणखी वाचा
Kilkari Programme : राज्यातील गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी किलकारी योजना, मिळणार हे लाभ
अमेरिकेत आढळला Bubonic प्लेगचा रुग्ण, एकेकाळी या महामारीमुळे 50 दशलक्ष लोकांचा गेलाय बळी