MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Kilkari Programme : राज्यातील गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी किलकारी योजना, मिळणार हे लाभ

Kilkari Programme : राज्यातील गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी किलकारी योजना, मिळणार हे लाभ

Kilkari Programme : गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी किलकारी ही नवीन योजना आणण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कोणकोणते लाभ मिळणार आहेत? जाणून घ्या सविस्तर…

2 Min read
Harshada Shirsekar
Published : Feb 08 2024, 02:07 PM IST| Updated : Feb 08 2024, 02:14 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
Image Credit : MAHARASHTRA DGIPR X

Kilkari Programme : राज्यातील गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी नव्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने गर्भवती महिलांसाठी किलकारी (Kilkari Programme) ही नवी योजना आणण्यात आली आहे. “प्रसूतीआधी, प्रसूतीनंतर, किलकारी प्रत्येक कुटुंबासोबत” हे योजनेचे ब्रीद वाक्य आहे.

दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नवी दिल्लीतून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री (Union Ministers of State for Health) डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यासाठी या योजनेचे लोकार्पण केले. कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री डॉ. एस. पी. सिंग बघेल, गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल देखील उपस्थित होते. 

24
Image Credit : Freepik

यावेळेस डॉ. भारती पवार म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे मातृ आणि शिशु आरोग्यासंबंधी नेहमी आग्रही असतात. त्यांच्या प्रेरणेने देशातील 18 राज्यांमध्ये किलकारी योजना (Kilkari Programme) सुरू असून, महाराष्ट्रातील सुमारे 28 लाख आणि गुजरात राज्यातील 22 लाख नोंदणी केलेल्या गर्भवती मातांना याचा लाभ होईल. या योजने (Kilkari Programme) अंतर्गत गर्भवती महिलेने आपल्या गावातील आशा सेविकेकडे नाव नोंदवणे आवश्यक आहे. सर्व गरोदर मातांनी नोंदणी करावी, असे आवाहनही यावेळेस त्यांनी केले.

34
Image Credit : our own

नोंदणी केलेल्या गरोदर मातेला चौथ्या आठवड्यापासून मोबाइलवर मोफत आणि स्थानिक भाषेत औषधे, आहार, लसीकरण, मानसिक, शारीरिक स्थिती इत्यादी बाबतचे मार्गदर्शन त्यांचे बाळ एक वर्षाचे होईपर्यंत केले जाणार आहे.

सार्वजनिक #आरोग्य विभागाच्यावतीने गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी #किलकारी या नव्या योजनेचा व #आशासेविका साठी मोबाईल अकादमीचा शुभारंभ झाला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री @DrBharatippawar यांनी नवी दिल्ली येथून महाराष्ट्र व गुजरात राज्यासाठी या योजनेचे ई-लोकार्पण केले. pic.twitter.com/HHomG7DT6D

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 7, 2024

44
Image Credit : MAHARASHTRA DGIPR X

तसेच राज्यातील आशा सेविकांसाठी मोबाइल अकादमीचाही शुभारंभ करण्यात आला.आशा सेविकांचे (Anganwadi Workers) कौशल्य वाढवण्यासाठी या अकादमीचा (Mobile Academy) शुभारंभही यावेळी करण्यात आला. त्याद्वारे राज्यातील 85 हजार आशा वर्कर्सना कामकाज करताना उपयोगी होईल, असे ऑनलाइन प्रशिक्षण (Online Training) देण्यात येणार आहे.

आणखी वाचा

Mumbai Property Tax : मुंबईकरांना मोठा दिलासा, यंदाही मालमत्ता करवाढ नाही

Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा देण्यास मान्यता, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय

Leopard Safari Project : जुन्नरमधील बिबट सफारी निर्मितीमुळे निसर्ग पर्यटनाला मिळेल चालना - सुधीर मुनगंटीवार

About the Author

HS
Harshada Shirsekar

Recommended Stories
Recommended image1
Indigo Update : आजही शुक्रवारी शेकडो उड्डाणे रद्द, मुंबई-पुणे-नागपूरसह प्रमुख विमानतळांवर गोंधळ
Recommended image2
माझो वरली महागडी गं, रिअल इस्टेटमध्ये न्यूयॉर्कच्या लोअर मॅनहॅटनशी होतेय तुलना, अपार्टमेंटची किंमत 1 लाख रुपये प्रति चौरस फूट
Recommended image3
School Bandh : शिक्षण विभागाच्या निर्णयांविरोधात राज्यातील शिक्षकांचा ‘बंद’; ८० हजारांहून अधिक शाळांवर परिणाम
Recommended image4
BMC Elections 2025 : महानगरपालिका निवडणुका लवकर? मतदारयाद्या 10 डिसेंबरला; आचारसंहिता 15 ते 20 तारखेदरम्यान लागू होण्याची शक्यता
Recommended image5
तुमचं रेल्वे स्टेशन 'वगळलं' गेलंय का? पुणे-नाशिक रेल्वे मार्गात मोठा बदल... संगमनेरचा पत्ता कट, वाचा अहिल्यानगरचं भविष्य!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved