शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टिनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी गायकवाड यांची चौकशी होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. 

मुंबई : मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्यावर चौकशी होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.** व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही गायकवाड आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मात्र, यावर आता फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीसांचे विधान: तक्रार नसलं तरी चौकशी होणार!

विधानभवनात माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे. यासाठी कुणाच्याही तक्रारीची गरज नाही. जर दखलपात्र गुन्हा असेल, तर पोलिस चौकशी करू शकतात. पोलीस कारवाई करतील आणि ती योग्यच असेल.” ते पुढे म्हणाले की, काही गुन्हे दखलपात्र तर काही अदखलपात्र असतात. गुन्ह्याची तीव्रता आणि परिस्थिती पाहून पोलीस चौकशी करतात आणि यातील गंभीरता पाहून पुढील पावले उचलली जातील.

संजय गायकवाड मारहाण प्रकरण काय आहे?

मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास, आमदार संजय गायकवाड बनियन आणि टॉवेलमध्ये आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये आले. त्यांच्या हातात डाळीची एक पिशवी होती. त्यांनी ती कर्मचाऱ्याला वास घेण्यासाठी दिली. त्यानंतर त्याला मारहाण केली. कर्मचाऱ्याला धक्का लागून तो खाली पडला. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

मुख्यमंत्र्यांची आणि शिंदे यांची नाराजी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातच यावर नाराजी व्यक्त केली. “आमदारांनी असं वर्तन करणं चूक आहे,” असं ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील गायकवाड यांना समज दिली असल्याचे सांगितले. मात्र, गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या वागणुकीचं समर्थन करत दक्षिण भारतातील लोकांवर टीका केली.

केटररवर कारवाई

या संपूर्ण घटनेनंतर गायकवाड यांच्यावर अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही. पण दुसरीकडे, संबंधित कॅन्टीन चालवणाऱ्या केटररचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने रद्द केला आहे. या केटररला आता अन्नपदार्थ तयार, विक्री व वितरणावर बंदी घालण्यात आली आहे.