सार

Bharat Ratna to LK Advani : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे भारतरत्न पुरस्कारासाठी अभिनंदन केले. 

Bharat Ratna to LK Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांना शनिवारी (3 फेब्रुवारी) भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

अडवाणींनी आयुष्य समाजकारण-राजकारणासाठी समर्पित केले - CM शिंदे

"अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारत सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे हे आनंददायी आहे. प्रखर राष्ट्रभक्त अशा ज्येष्ठ नेते आडवाणीजी यांनी आपले अखंड आयुष्य समाजकारण आणि राजकारण यासाठी समर्पित केले आहे.

अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर (Ram Mandir Ayodhya) व्हावे हे त्यांचे स्वप्न देखील साकार झाले आहे. या मंदिरासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, रथयात्रेचे (Rathyatra) नेतृत्व या गोष्टी त्यांच्या प्रभावी नेतृत्वशैलीचे उदाहरण आहे. देशाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी असणारे आणि सर्वसमावेशक असे त्यांचे नेतृत्व आमच्यासाठी प्रेरणादायी आणि आदरणीय आहे.

उत्तम संसदपटू आणि परखड विचारांचे नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर होणे अत्यंत आनंददायी बाब आहे. त्यांना उत्तम आयुरारोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे", अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांचे भारतरत्न पुरस्कारासाठी (Bharat Ratna Award) अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (LK Advani) यांना भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna Award) जाहीर करण्यात आल्याची माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी  'X' वर पोस्ट शेअर करून माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “श्री लालकृष्ण अडवाणीजी (LK Advani) यांना भारतरत्न पुरस्काराने (LK Advani Bharat Ratna) सन्मानित करण्यात येणार आहे, हे कळवताना मला अतिशय आनंद होत आहे. मी त्यांच्याशीही संवाद साधला आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. 

आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक असलेले अडवाणीजी यांचे भारताच्या (India) विकासामधील (Development) योगदान अतुलनीय आहे. तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणूनही त्यांनी देशसेवा केली आहे. देशाचे गृहमंत्री (Home Minister) आणि माहिती व प्रसारण मंत्री (I&B Minister) अशी त्यांची ओळख आहे”. अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांचे कौतुक केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही केले अभिनंदन

देशाच्या विकासामध्ये मोलाचे योगदान - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 

आणखी वाचा

LK Advani : BJPचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर, PM नरेंद्र मोदींची घोषणा

Ahlan Modi : PM नरेंद्र मोदी UAEमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार, 60 हजारहून अधिक लोकांनी केली नोंदणी

RRB Technician Recruitment 2024: 9 हजार रिक्त पदांसाठी मेगाभरती, असा करा ऑनलाइन अर्ज