सार
LK Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X' वर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे.
LK Advani Bharat Ratna : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वतः 'X'वर याबाबत पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “श्री लालकृष्ण अडवाणीजी (LK Advani) यांना भारतरत्न पुरस्काराने (LK Advani Bharat Ratna) सन्मानित करण्यात येणार आहे, हे कळवताना मला अतिशय आनंद होत आहे. मी त्यांच्याशीही संवाद साधला आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक असलेले अडवाणीजी यांचे भारताच्या विकासामधील योगदान अतुलनीय आहे. तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणूनही त्यांनी देशसेवा केली आहे. देशाचे गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री अशी त्यांची ओळख आहे”. अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांचे कौतुक केले आहे.
लालकृष्ण अडवाणी यांची राजकीय कारकीर्द
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (LK Advani Bharat Ratna) यांची देशातील राजकारणामध्ये दीर्घ आणि प्रभावशाली राजकीय कारकीर्द राहिली आहे. अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी फाळणीपूर्वीच्या सिंधमध्ये झाला. वर्ष 1947मध्ये फाळणीनंतर अडवाणी दिल्लीमध्ये आले. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केलेल्या भारतीय जनसंघामध्ये ते 1951मध्ये सहभागी झाले.
वर्ष 1970 मध्ये ते राज्यसभेचे सदस्य झाले आणि वर्ष 1989पर्यंत त्यांनी याच जागेसाठी कार्य केले. डिसेंबर1972 मध्ये त्यांची भारतीय जनसंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. भारतीय जनसंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तीन वर्षांनंतर म्हणजे 1975 मध्ये मोरारजी देसाई यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळामध्ये अडवाणी यांची जनता पक्षामध्ये माहिती व प्रसारण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.
आणखी वाचा
Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा मासिक पगार किती? जाणून घ्या