सार

RRB Technician Recruitment 2024 : एकूण 9 हजार रिक्त जागांसाठी लवकरच भरती करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय रेल्वेने दिली आहे. ऑनलाइन कसा करावा अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती…

RRB Technicians Recruitment 2024 : रेल्वे भरती मंडळाने (RRB) टेक्निशिअन पदाकरिता रिक्त असलेल्या जागांवर भरती (RRB vacancies) करण्यासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार एकूण 9 हजार रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.

RRB टेक्निशिअन पदासाठी मार्च-एप्रिल 2024 (March-April 2024) पासून ऑनलाइन अर्ज (Submission of Online Applications) सादर करण्याची प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित आहे. RRB टेक्निशिअन भरती 2024 दोन टप्प्यांमध्ये आयोजित केली जाणार असल्याची माहिती आहे. यानंतर रेल्वे भरती बोर्ड (Railway Recruitment Board) द्वारे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी (Document verification) केली जाईल. अधिकृत अधिसूचनेनुसार, RRB टेक्निशिअन (RRB Technicians) पदासाठी दस्तऐवज पडताळणी प्रक्रिया फेब्रुवारी 2025 पर्यंत करणे अपेक्षित आहे.

RRB टेक्निशिअन भरती 2024साठी अर्ज कसा करावा?

RRB टेक्निशिअन भरती प्रक्रियेमध्ये नोंदणी करण्यासाठी उमेदवार खालील स्टेप्स फॉलो करा.

Step 1: रेल्वे भरती बोर्ड (RRB)- rrbcdg.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

Step 2: टेक्निशिअन भरती विभागामध्ये उपलब्ध असलेल्या 'अप्लाय ऑनलाइन' (Apply Online) या पर्यायावर क्लिक करा.

Step 3: सर्व आवश्यक माहिती अचूकपणे ऑनलाइन फॉर्ममध्ये नमूद करावी. वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती सबमिट करताना पुन्हा एकदा खात्री करून घ्यावी.

Step 4: फोटो आणि स्वाक्षरीसह आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या कॉपी अपलोड करा. अर्ज शुल्क भरण्यासाठी नेक्स्ट हा पर्याय निवडा.

RRB टेक्निशिअन भरती 2024 : अर्ज शुल्काबाबतीच माहिती

RRB टेक्निशिअन पदासाठी अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. RRB टेक्निशिअन भरतीसाठी नोंदणी शुल्क खालील प्रमाणे आहे.

  • General/OBC/EWS : 500 रूपये
  • SC/ST/PH : 250 रूपये
  • महिला (सर्व श्रेणी) : 250 रूपये

अधिक माहिती जाणून घ्या RRBच्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊ शकता.

आणखी वाचा :

Rose Day 2024: रोझ डेच्या निमित्ताने तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीला पाठवा खास मेसेज

Orange Tea: सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेला ऑरेंज टी तुम्ही ट्राय केलात का? जाणून घ्या रेसिपी

अभिनेत्री पूनम पांडेचे Cervical Cancer ने निधन, वेळीच ओळखा या कर्करोगाचा धोका