MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • ‘आवडेल तिथे प्रवास’ आता आणखी स्वस्त! एसटी महामंडळाकडून पास दरात मोठी कपात, जाणून घ्या नवे दर

‘आवडेल तिथे प्रवास’ आता आणखी स्वस्त! एसटी महामंडळाकडून पास दरात मोठी कपात, जाणून घ्या नवे दर

MSRTC Travel Pass Price : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) 'आवडेल तिथे प्रवास' योजनेच्या दरात मोठी कपात केली. नवीन दरानुसार पास २०० ते ८०० रुपयांनी स्वस्त झाले असून, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलतीही उपलब्ध आहेत.

2 Min read
Rameshwar Gavhane
Published : Dec 14 2025, 04:31 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
‘आवडेल तिथे प्रवास’ आता आणखी स्वस्त!
Image Credit : our own

‘आवडेल तिथे प्रवास’ आता आणखी स्वस्त!

मुंबई : फिरण्याची आवड असणाऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) एक आनंदाची बातमी दिली आहे. राज्यातच नव्हे तर राज्याबाहेरही कमी खर्चात प्रवास करता यावा, यासाठी सुरू करण्यात आलेली ‘आवडेल तिथे प्रवास’ योजना आता अधिक किफायतशीर करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत प्रवाशांना चार किंवा सात दिवस सलग एसटी बसमधून प्रवास करता येतो. विशेष म्हणजे अलीकडेच या पासच्या दरात मोठी कपात करण्यात आली असून, विविध प्रकारच्या बससाठीचे पास २०० ते ८०० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

26
मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत खास सवलती
Image Credit : social media

मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत खास सवलती

५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना या पासवर ५० टक्के सवलत मिळणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ६० ते ७५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबासाठी ही योजना अधिक फायदेशीर ठरत आहे.

पूर्वी साध्या एसटी बससाठी चार दिवसांचा पास घेण्यासाठी प्रवाशांना १८१४ रुपये मोजावे लागत होते. आता तोच पास १३६४ रुपयांत उपलब्ध असून, तब्बल ४५० रुपयांची कपात करण्यात आली आहे.

तसेच १२ मीटर ई-बस ‘शिवाई’च्या पासचे दरही २६८१ रुपयांवरून २०७२ रुपये इतके कमी करण्यात आले आहेत. म्हणजेच जवळपास ७८९ रुपयांची बचत होणार आहे. 

Related Articles

Related image1
दिलासादायक अपडेट! कल्याण–पेंधर मेट्रो मार्गिका 12 ला गती, सुरूवातीची तारीख कधी? जाणून घ्या सविस्तर
Related image2
मुंबईकरांनो, वीकेंडचा प्लॅन आखताना जपून! रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक
36
चार दिवसांसाठी पास दर (प्रौढ प्रवासी)
Image Credit : our own

चार दिवसांसाठी पास दर (प्रौढ प्रवासी)

साधी एसटी बस

जुने दर: ₹1814 नवे दर: ₹1364

शिवशाही बस

जुने दर: ₹2533 नवे दर: ₹1818

ई-शिवाई बस

जुने दर: ₹2861 नवे दर: ₹2072 

46
चार दिवसांसाठी पास दर (मुले – 5 ते 12 वर्षे)
Image Credit : others

चार दिवसांसाठी पास दर (मुले – 5 ते 12 वर्षे)

साधी बस

जुने दर: ₹910 नवे दर: ₹685

शिवशाही बस

जुने दर: ₹1269 नवे दर: ₹911

ई-शिवाई बस

जुने दर: ₹1433 नवे दर: ₹1038 

56
सात दिवसांसाठी पास दर (प्रौढ प्रवासी)
Image Credit : social media

सात दिवसांसाठी पास दर (प्रौढ प्रवासी)

साधी एसटी बस

जुने दर: ₹3171 नवे दर: ₹2638

शिवशाही बस

जुने दर: ₹4429 नवे दर: ₹3175

ई-शिवाई बस

जुने दर: ₹5003 नवे दर: ₹3619

66
सात दिवसांसाठी पास दर (मुले)
Image Credit : Getty

सात दिवसांसाठी पास दर (मुले)

साधी बस

जुने दर: ₹1588 नवे दर: ₹1194

शिवशाही बस

जुने दर: ₹2217 नवे दर: ₹1590

ई-शिवाई बस

जुने दर: ₹2504 नवे दर: ₹1812

राज्यभर किंवा परराज्यात स्वस्त, सोयीस्कर आणि मुक्त प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल, तर ‘आवडेल तिथे प्रवास’ योजना नक्कीच प्रवाशांसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
मुंबईत सर्वाधिक CO₂ उत्सर्जन; दिल्ली, पुणे, बंगळूरमध्येही धोकादायक पातळी!
Recommended image2
मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील कोंडीला ब्रेक, मीरा-भाईंदरमध्ये नवे वाहतूक नियोजन; 15 डिसेंबरपासून अंमलबजावणी
Recommended image3
महाराष्ट्राला गतिमानता! पुणे-मुंबई दीड तासात, संभाजीनगरसाठी नवा एक्स्प्रेसवे; नितीन गडकरींची मोठी घोषणा
Recommended image4
Nagpur Smart City Case : स्मार्ट सिटी प्रकरणात तुकाराम मुंढेंना क्लीन चिट; ईओडब्ल्यू व पोलिसांचा अहवाल विधानसभेत सादर
Recommended image5
BMC Elections 2025 : महापालिका निवडणुकीसाठी भाजप–शिंदे गट एकत्र लढणार; महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात
Related Stories
Recommended image1
दिलासादायक अपडेट! कल्याण–पेंधर मेट्रो मार्गिका 12 ला गती, सुरूवातीची तारीख कधी? जाणून घ्या सविस्तर
Recommended image2
मुंबईकरांनो, वीकेंडचा प्लॅन आखताना जपून! रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved