MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • नाशिककरांचा मुंबई प्रवास होणार 'कूल'! अवघ्या २ तासांत गाठता येणार मुंबापुरी; पाहा काय आहे गुड न्यूज

नाशिककरांचा मुंबई प्रवास होणार 'कूल'! अवघ्या २ तासांत गाठता येणार मुंबापुरी; पाहा काय आहे गुड न्यूज

Nashik Mumbai AC Local Train Update: नाशिक ते मुंबई एसी लोकल सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून यामुळे प्रवासाचा वेळ २ तासांवर येणारय. कसारा घाटातील तांत्रिक अडथळे दूर करून हा प्रवास आरामदायी होणार असल्याने नाशिकच्या विकासालाही चालना मिळेल.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 22 2026, 03:44 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
नाशिककरांचा मुंबई प्रवास होणार 'कूल'! अवघ्या २ तासांत गाठता येणार मुंबापुरी
Image Credit : our own

नाशिककरांचा मुंबई प्रवास होणार 'कूल'! अवघ्या २ तासांत गाठता येणार मुंबापुरी

नाशिक : दररोज कामानिमित्त नाशिक-मुंबई अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. नाशिक ते मुंबई हा प्रवास आता केवळ वेगवानच नाही, तर 'एसी लोकल'मुळे अधिक आरामदायी आणि गारेगार होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मक माहिती दिली असून नाशिककरांच्या स्वप्नपूर्तीचे संकेत दिले आहेत. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार!
Image Credit : SOCIAL MEDIA

प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार!

नाशिक आणि मुंबई ही दोन महत्त्वाची शहरे जोडण्यासाठी सध्या रेल्वेवर मोठा ताण आहे. प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आता मुंबई-नाशिक एसी लोकल सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. गिरीश महाजन यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात स्पष्ट केले की, ही सेवा सुरू झाल्यास नाशिक ते मुंबई हे अंतर अवघ्या दोन तासांत पार करणे शक्य होईल. 

Related Articles

Related image1
UPSC Success: सिक्युरिटी गार्डचा मुलगा पोहोचला UPSC मुलाखतीला, भावनिक व्हिडिओ होतोय व्हायरल
Related image2
चेन्नईत पर्यटनाचा थरार करुण अंतात बदलला, महाराष्ट्राच्या लेकीचा समुद्रात बुडून मृत्यू; जळगावचा तरुण अद्याप बेपत्ता
34
कसारा घाटातील अडथळा दूर होणार?
Image Credit : social media

कसारा घाटातील अडथळा दूर होणार?

सध्या मुंबईची लोकल सेवा केवळ कसाऱ्यापर्यंत मर्यादित आहे. कसारा ते नाशिक दरम्यान लोकल सुरू करण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले, मात्र कसारा घाटातील तांत्रिक अडचणींमुळे साधी लोकल चालवणे कठीण जात होते. मात्र, एसी लोकलसाठी अशा तांत्रिक अडचणी येणार नाहीत, असे तांत्रिक विश्लेषण समोर आले आहे. त्यामुळे कसाऱ्यापुढील रेल्वेचा प्रवास आता थेट नाशिकपर्यंत विस्तारला जाण्याची शक्यता आहे. 

44
औद्योगिक आणि आर्थिक क्रांतीला वेग
Image Credit : Asianet News

औद्योगिक आणि आर्थिक क्रांतीला वेग

ही एसी लोकल सेवा केवळ प्रवासासाठीच नाही, तर नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी गेमचेंजर ठरणार आहे.

वेळेची बचत: प्रवासाचा वेळ कमी झाल्याने नोकरी आणि व्यवसायासाठी ये-जा करणे सोपे होईल.

आर्थिक विकास: दोन्ही शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढल्याने औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळेल.

आरामदायी प्रवास: घाटातील प्रवासाचा थकवा एसी लोकलमुळे कमी होणार आहे. 

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मुंबई बातम्या
Recommended Stories
Recommended image1
दिल्लीत विद्यार्थ्यांचा एल्गार, 'कॉक्रोच' आंदोलनाच्या वेळी नेमकं काय घडलं?
Recommended image2
नवी मुंबई विमानतळाला ऐतिहासिक ओळख; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण
Recommended image3
महागाईचा फटका सलून सेवांवरही; महाराष्ट्रात दाढी-कटिंगच्या दरात 20 टक्के वाढ, सर्वसामान्यांचा खिसा आणखी हलका
Recommended image4
Pune : पुण्यातील जत्रेत 'मेड इन पाकिस्तान' चादर, धुतल्यावर सत्य समोर आल्याने खळबळ!
Recommended image5
अमित ठाकरे यांचे कॉकरोच जनता पार्टीबद्दल केलं मोठे वक्तव्य, '...तर मला आनंद होईल'
Related Stories
Recommended image1
UPSC Success: सिक्युरिटी गार्डचा मुलगा पोहोचला UPSC मुलाखतीला, भावनिक व्हिडिओ होतोय व्हायरल
Recommended image2
चेन्नईत पर्यटनाचा थरार करुण अंतात बदलला, महाराष्ट्राच्या लेकीचा समुद्रात बुडून मृत्यू; जळगावचा तरुण अद्याप बेपत्ता
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved