MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Solapur New IT Park Update: पुणे-मुंबईला विसरा! आता सोलापुरात आकाराला येणार भव्य 'IT हब'; फडणवीसांचा शब्द पूर्ण, ५० एकर जमीन मंजूर

Solapur New IT Park Update: पुणे-मुंबईला विसरा! आता सोलापुरात आकाराला येणार भव्य 'IT हब'; फडणवीसांचा शब्द पूर्ण, ५० एकर जमीन मंजूर

Solapur New IT Park Update: पुणे-मुंबईनंतर आता सोलापूर महाराष्ट्राचे नवे आयटी डेस्टिनेशन बनणार आहे. होटगी येथे ५० एकर जागेवर भव्य आयटी हब उभारले जात असून या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होतील.  

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 22 2026, 06:05 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
पुणे मुंबईला विसरा! आता सोलापुरात आकाराला येणार भव्य 'IT हब
Image Credit : X

पुणे-मुंबईला विसरा! आता सोलापुरात आकाराला येणार भव्य 'IT हब

सोलापूर : महाराष्ट्रातील आयटी क्षेत्राचा नकाशा आता बदलणार आहे! पुण्याच्या हिंजवडीनंतर आता सोलापूर राज्याचे नवे आयटी डेस्टिनेशन म्हणून उदयास येत आहे. सोलापूरकरांनी गेल्या अनेक वर्षांपासून पाहिलेले 'आयटी पार्क'चे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द प्रशासनाने पूर्ण केला आहे. 

24
होटगी येथे ५० एकरवर पसरणार तंत्रज्ञानाचे जाळे
Image Credit : X

होटगी येथे ५० एकरवर पसरणार तंत्रज्ञानाचे जाळे

सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी हे आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल मानले जात आहे. होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (MIDC) हस्तांतरित करण्याचे अधिकृत आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना मिळाल्या असून, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

Related Articles

Related image1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! जानेवारीचा हप्ता खात्यात जमा होणार; सरकारने निधी केला मंजूर
Related image2
नाशिककरांचा मुंबई प्रवास होणार 'कूल'! अवघ्या २ तासांत गाठता येणार मुंबापुरी; पाहा काय आहे गुड न्यूज
34
तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी
Image Credit : our own

तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

या प्रकल्पामुळे सोलापूरच्या स्थानिक तरुणांना आता नोकरीसाठी पुणे किंवा मुंबईची वाट धरावी लागणार नाही.

स्थानिक रोजगार: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात हजारो नव्या नोकऱ्या उपलब्ध होतील.

आर्थिक क्रांती: आयटी पार्कमुळे शहराच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल.

पाठपुराव्याला यश: आमदार देवेंद्र कोठे यांनी या प्रकल्पासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले आहे. 

44
वस्त्रोद्योगालाही मिळणार 'बूस्टर डोस'
Image Credit : our own

वस्त्रोद्योगालाही मिळणार 'बूस्टर डोस'

केवळ आयटीच नव्हे, तर सोलापूरची ओळख असलेल्या वस्त्रोद्योगासाठीही सरकारने कंबर कसली आहे. इचलकरंजीच्या धर्तीवर सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला विशेष सवलती देण्याबाबत आगामी अधिवेशनात महत्त्वाची बैठक होणार आहे. याशिवाय, शहरातील विमानसेवा आणि समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्याने सोलापूर आता गुंतवणुकीसाठी सज्ज झाले आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Baramati Rahuri Assembly Bypoll Election: महाराष्ट्रात निवडणुकीचा धुरळा! बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं; 'या' दिवशी होणार मतदान!
Recommended image2
Hadapsar Railway Station: पुणेकरांची 'लाईफलाईन' सुसाट! हडपसर रेल्वे स्थानकाचा कायापालट; आता चौथ्या प्लॅटफॉर्मला ग्रीन सिग्नल!
Recommended image3
Kumbha Mela 2027 : कुंभमेळ्यात हिंदूंव्यतिरिक्त कुणी स्टॉल लावला तर उखडून टाका; नितेश राणे यांचे वक्तव्य चर्चेत
Recommended image4
Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा 'अस्मानी' संकट! उन्हाच्या तडाख्यात ७ जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा; हवामान खात्याचा मोठा इशारा
Recommended image5
Ration Card: रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; जूनपर्यंतचे धान्य आता मिळणार 'अॅडव्हान्स'मध्ये
Related Stories
Recommended image1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! जानेवारीचा हप्ता खात्यात जमा होणार; सरकारने निधी केला मंजूर
Recommended image2
नाशिककरांचा मुंबई प्रवास होणार 'कूल'! अवघ्या २ तासांत गाठता येणार मुंबापुरी; पाहा काय आहे गुड न्यूज
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved