MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • आता डोंगर-दऱ्यांतही घुमणार 'लालपरी'चा हॉर्न! दुर्गम आदिवासी पाड्यांसाठी खास 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' बस सेवा सुरू

आता डोंगर-दऱ्यांतही घुमणार 'लालपरी'चा हॉर्न! दुर्गम आदिवासी पाड्यांसाठी खास 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' बस सेवा सुरू

महाराष्ट्र सरकारने दुर्गम आदिवासी पाड्यांसाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' नावाची खास बस सेवा सुरू केली आहे. "पाडा तिथे एसटी" या मोहिमेअंतर्गत, १०० अत्याधुनिक मिडी बसेस सह्याद्री आणि मेळघाटच्या दऱ्याखोऱ्यांत धावतील. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 22 2026, 08:42 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
दुर्गम आदिवासी पाड्यांसाठी खास 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' बस सेवा सुरू
Image Credit : social media

दुर्गम आदिवासी पाड्यांसाठी खास 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' बस सेवा सुरू

मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी आता केवळ गावांपर्यंतच मर्यादित न राहता थेट आदिवासी पाड्यांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचणार आहे. स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या सह्याद्री आणि मेळघाटच्या दऱ्याखोऱ्यांतील पाड्यांसाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. "गाव तिथे एसटी" या संकल्पनेचा विस्तार करत आता "पाडा तिथे एसटी" ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
खास 'मिडी' बसेसचा ताफा सज्ज
Image Credit : social media

खास 'मिडी' बसेसचा ताफा सज्ज

अरुंद रस्ते, तीव्र चढ-उतार आणि वळणावळणाचे घाट यामुळे दुर्गम भागात मोठ्या बसेस नेणे अशक्य होते. यावर उपाय म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ९ मीटर लांबीच्या, ३५ आसनी १०० अत्याधुनिक मिडी बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेसना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ असे नाव देण्यात आले असून, त्या खास करून दुर्गम भागातील भौगोलिक स्थितीचा विचार करून तयार करण्यात आल्या आहेत. 

Related Articles

Related image1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! जानेवारीचा हप्ता खात्यात जमा होणार; सरकारने निधी केला मंजूर
Related image2
पुणेकरांनो सावधान! रमजाननिमित्त कोंढव्यातील वाहतूक मार्गांत मोठे बदल; घराबाहेर पडण्यापूर्वी पाहा पर्यायी रस्ते
34
आदिवासी बांधवांची पायपीट थांबणार
Image Credit : our own

आदिवासी बांधवांची पायपीट थांबणार

राज्यातील ९३% लोकसंख्या एसटीशी जोडलेली असली, तरी मेळघाट आणि सह्याद्रीतील अनेक पाडे अद्याप वंचित होते. या निर्णयामुळे होणारे बदल

शिक्षण: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आता मैलोन्मैल चालत जाण्याची गरज उरणार नाही.

आरोग्य: आपत्कालीन परिस्थितीत माता-भगिनींना आणि रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचणे सोपे होईल.

रोजगार: दुर्गम भागातील तरुण रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी शहरांशी सहज जोडले जातील.

44
विकासाचा नवा अध्याय
Image Credit : Getty

विकासाचा नवा अध्याय

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या उपक्रमाचे वर्णन 'परिवर्तनाची गती' असे केले आहे. "दुर्गम भागातील आदिवासी समाज आता एसटीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राशी जोडला जाईल. विकासाची गंगा प्रत्येक पाड्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लवकरच डोंगर-दऱ्यांच्या शांततेत 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' बसचा हॉर्न घुमणार असून ती विकासाची नवी पहाट घेऊन येईल.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
खाद्यतेल विक्रेत्यांना मोठा दिलासा; सुटे तेल विक्रीवरील निर्बंधांची अंमलबजावणी वर्षभर पुढे ढकलली
Recommended image2
Ganeshotsav: सीमेवरही दगडूशेठ गणपतीचा जयघोष, जवानांसाठी पुण्यातून बाप्पा रवाना!
Recommended image3
Maharashtra Rain Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 2 ते 5 सप्टेंबरदरम्यान या 6 जिल्ह्यांत दमदार पावसाची शक्यता
Recommended image4
Maharashtra Voter List 2026 : महाराष्ट्राच्या मतदार यादीत मोठा बदल; 2 कोटींहून अधिक नावे वगळली
Recommended image5
Ganeshotsav 2026 : पुण्यात गणेशोत्सवाआधी DJ च्या आवाजावरून वाद; शेकडो नागरिकांचा बंदीची मागणी
Related Stories
Recommended image1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! जानेवारीचा हप्ता खात्यात जमा होणार; सरकारने निधी केला मंजूर
Recommended image2
पुणेकरांनो सावधान! रमजाननिमित्त कोंढव्यातील वाहतूक मार्गांत मोठे बदल; घराबाहेर पडण्यापूर्वी पाहा पर्यायी रस्ते
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved