MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! जानेवारीचा हप्ता खात्यात जमा होणार; सरकारने निधी केला मंजूर

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! जानेवारीचा हप्ता खात्यात जमा होणार; सरकारने निधी केला मंजूर

Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा रखडलेला जानेवारीचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. सरकारने यासाठी ९८.२५ कोटींचा निधी वर्ग केला असून, प्रत्येक पात्र महिलेला १,५०० रुपये मिळतील. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 22 2026, 05:39 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! जानेवारीचा हप्ता खात्यात जमा होणार
Image Credit : social media

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! जानेवारीचा हप्ता खात्यात जमा होणार

मुंबई : राज्यभरातील लाखो महिला ज्या बातमीची वाट पाहत होत्या, ती अखेर समोर आली आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट आली असून, रखडलेले पैसे लवकरच महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर पडलेला हा हप्ता आता शेवटच्या टप्प्यात आहे. 

25
९८ कोटींचा निधी वर्ग; हालचालींना वेग
Image Credit : social media

९८ कोटींचा निधी वर्ग; हालचालींना वेग

गेल्या काही दिवसांपासून लाभार्थी महिलांमध्ये जानेवारीच्या हप्त्याबाबत संभ्रम होता. मात्र, ताज्या माहितीनुसार, सरकारने या हप्त्यासाठी निधीची तरतूद पूर्ण केली आहे. सामाजिक न्याय विभागाने ९८.२५ कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित केले आहेत. या निर्णयामुळे आता निधी वितरणाचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच पात्र महिलांच्या खात्यात प्रत्येकी १,५०० रुपये जमा होतील. 

Related Articles

Related image1
नाशिककरांचा मुंबई प्रवास होणार 'कूल'! अवघ्या २ तासांत गाठता येणार मुंबापुरी; पाहा काय आहे गुड न्यूज
Related image2
चेन्नईत पर्यटनाचा थरार करुण अंतात बदलला, महाराष्ट्राच्या लेकीचा समुद्रात बुडून मृत्यू; जळगावचा तरुण अद्याप बेपत्ता
35
हप्ता लांबणीवर का पडला?
Image Credit : iSTOCK

हप्ता लांबणीवर का पडला?

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आचारसंहितेच्या प्रक्रियेमुळे या योजनेच्या निधी वितरणात विलंब झाला होता. निवडणुका संपल्यानंतर आता प्रशासनाने थकीत हप्ते वाटपाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू केली आहे. 

45
KYC अपडेटसाठी महिलांना मोठी संधी
Image Credit : iSTOCK

KYC अपडेटसाठी महिलांना मोठी संधी

ज्या महिलांनी सर्व अटी पूर्ण करूनही अद्याप पैसे मिळालेले नाहीत, त्यांच्यासाठी सरकारने महत्त्वाची सूचना दिली आहे.

अनेक महिलांचे अर्ज पात्र असूनही KYC मधील त्रुटींमुळे पैसे अडकले आहेत.

अशा महिलांना आता त्यांची माहिती अपडेट करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

ज्यांच्या अर्जात चुका झाल्या आहेत किंवा ज्यांनी अद्याप केवायसी केलेली नाही, त्यांनी ती त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. 

55
योजनेचे स्वरूप थोडक्यात
Image Credit : iSTOCK

योजनेचे स्वरूप थोडक्यात

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना या योजनेद्वारे दरमहा आर्थिक मदत दिली जाते. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे लवकरच मिळतील, अशी चिन्हे असल्याने महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा वरुणराजाचं आगमन! ७ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा
Recommended image2
Pune Railway Station: पुणेकरांचा रेल्वे प्रवास होणार हायटेक! वर्षभरात ६ नवे फलाट; १७०० कोटींच्या विकासकामांनी स्टेशनचा कायापालट
Recommended image3
महात्मा फुले योजना ते मुख्यमंत्री सहाय्यता निधी, गंभीर आजारांसाठी सरकारी मदतीचा 'मास्टर प्लॅन'; असा करा अर्ज!
Recommended image4
महागाईचा 'टोल'धाड! पुणे-सातारा प्रवास महागला; खेडशिवापूर, अनेवाडीला खिसा रिकामा होणार, पण 'या' मार्गावर दिलासा!
Recommended image5
मुंबई-पुणे प्रवास सुसाट! १० रेल्वे फाटकं होणार इतिहासजमा; पाहा काय आहे मध्य रेल्वेचा 'मास्टर प्लॅन'
Related Stories
Recommended image1
नाशिककरांचा मुंबई प्रवास होणार 'कूल'! अवघ्या २ तासांत गाठता येणार मुंबापुरी; पाहा काय आहे गुड न्यूज
Recommended image2
चेन्नईत पर्यटनाचा थरार करुण अंतात बदलला, महाराष्ट्राच्या लेकीचा समुद्रात बुडून मृत्यू; जळगावचा तरुण अद्याप बेपत्ता
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved