सार

अकोल्यातल्या अकोट शहरात एक खळबळजनक प्रकार घडला आहे. शंकर बुंदले या तरुणाने नेहमीप्रमाणे खिश्यात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला आहे.

Akola News : अकोल्यातल्या अकोट शहरात एक खळबळजनक प्रकार घडला आहे. शंकर बुंदले या तरुणाने नेहमीप्रमाणे खिश्यात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला आहे. मात्र प्रसंगावधानाने तो थोडक्यात बचावला आहे. अकोल्यातल्या अकोट शहरात एक खळबळजनक प्रकार घडला आहे. यामध्ये शंकर बुंदले या तरुणाने नेहमीप्रमाणे मोबाईल फोन खिश्यात ठेवला होता. दरम्यान, खिश्यातून अचानक धुर निघत असल्याचे त्याच्या लक्षात आले, अन् त्याने लागलीच मोबाइल बाहेर काढला. त्यानंतर मोबाईलमधून निघणारा धूर बघून त्याने तो मोबाईल रस्त्यावर फेकला. तेवढ्यात त्या मोबाईलचा मोठा स्फोट झाला.

सुदैवाने तरुणाने मोबाईल खाली फेकल्यामुळे मोबाईल स्फोटातून तो थोडक्यात बचावला. मात्र मोबाईलमुळे त्याच्या पैंटचा खिसा पूर्णपणे जळालेला आहे. बुंदले या तरुणाकडे एका कंपनीचा महागडा मोबाईल होता. मोबाईल गरम झाल्याने हा प्रकार घडल्याचे समजते आहे. अकोट शहरातल्या नगरपालिकेसमोर हा संपूर्ण प्रकार घडला आहे.

आणखी वाचा

Rain Alert : कोकणात येत्या 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता, एनडीआरएफची टीम तैनात