सार
सध्या पुणे आणि मुंबईतील पावसामुळे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पोस्ट होत आहेत, ज्यामध्ये लोकांची होणारी तारांबळ स्पष्ट दिसून येत आहे. पुण्यात पाणी इमारतींमध्ये शिरून महागडी वाहने खराब झाली असून, अनेक लोक विस्थापित झाले आहेत.
सध्या सोशल मीडियावर पुणे आणि मुंबई येथील पावसाचे अनेक व्हिडीओ पोस्ट केलेले दिसून येत आहेत. या व्हिडिओमधून लोकांची किती तारांबळ उडाली आहे तेही स्पष्टपणे लक्षात येत आहे. पुण्यामध्ये तर लोकांच्या इमारतींमध्ये पाणी शिरले, त्यांची महागडी वाहने त्या पाण्यामुळे खराब झाली तर दुसऱ्या बाजूला अनेक लोकांना विस्थापित होऊन दुसरीकडे जावे लागल्याचे दिसून आले आहे. असाच एक व्हिडीओ हिंजवडी येथील आयटी पार्कचा व्हायरल होत असून तेथे पाण्यामुळे लोकांची किती तारांबळ उडाली आहे ते स्पष्टपणे दिसून येत आहे.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये लोकांची उडाली तारांबळ -
हिंजवडी आयटी पार्कमध्ये लोकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले आहे, रस्त्यावर बरेच पाणी जमा झाले आहे. त्या पाण्यामुळे तेथे येणाऱ्या लोकांना रस्त्यावरून मार्ग काढावा लागत आहे. पाण्याचा मोठा लोंढा येत असून लोक त्याच्यातून पायी आणि गाड्यांमधून मार्ग काढत आहेत. हिंजवडी येथे पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे हा त्रास होत असल्याचे प्रामुख्याने लक्षात येत आहे. नवीन पुण्याचे शिल्पकार धन्यवाद अशा आशयाचे कॅप्शन टाकून व्हिडीओ टाकले जात आहेत.
सोशल मीडियावर केले गेले ट्रोल -
सोशल मीडियावर सरकारला या मुद्यावरून ट्रोल करण्यात आले आहे. येथे पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची गैरसोय होत असल्याचे यामध्ये म्हटले आहे. सोशल मीडियावर हिंजवडी आयटी पार्कचे आता हिंजवडी वॉटर पार्क झाल्याचे म्हटले आहे. हिंजवडी येथे ट्राफिक पाठोपाठ आयटी कर्मचाऱ्यांना आता पाण्याचा सामना करावा लागत आहे.
आणखी वाचा -
पंतप्रधान मोदी कारगिल शहीदांना श्रद्धांजली वाहून प्रकल्पाची करणार पायाभरणी
Kargil Vijay Diwas : कोरोलिनची लढाई खूप कठीण होती : ब्रिगेडियर कुशल ठाकूर