सार

Hair Care: तुम्ही केस विंचरण्यासाठी प्लास्टिकचा कंगवा वापरताय? तर आजच तो बदला. त्याऐवजी लाकडाचा कंगवा वापरण्यास सुरूवात करा. लाकडाचा कंगवा वापरल्याने काय फायदे होतात याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर....

Wooden Comb Benefits :  बहुतांशजणांना उत्तम दर्जाचे शॅम्पू, कंडिशनर किंवा तेल लावल्यानंतरही केस गळण्यासह तुटण्याची समस्येचा सामना करावा लागतो. यामागे काही कारणे असू शकतात. पण तुम्ही केस विंचरण्यासाठी वापरत असलेल्या कंगव्यामुळे केसांचे नुकसान होत असेल तर? यासंदर्भातच आपण जाणून घेणार आहोत अधिक....

केस विंचरण्यासाठी तुम्ही ज्या कंगव्याचा वापर करता त्याचा प्रभाव तुमच्या केस आणि मुळांवर होतो. यामुळे अशा समस्यांपासून दूर राहण्यासाठी लाकडी कंगव्याचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. 

केसांच्या मुळांपर्यंत रक्तपुरवठा
केस विंचरण्यासाठी लाकडाचा कंगवा वापरल्याने केसांच्या मुळांच्या येथे असलेल्या अ‍ॅक्यूप्रेशर पॉइंट्सवर (Acupressure Points) दबाव पडतो. यामुळे केसांच्या मुळांना मसाज मिळतो. याशिवाय केसांच्या मुळांपर्यंत रक्तपुरवठा व्यवस्थितीत होतो. केसांची मुळ हेल्दी असल्यास केसांना याचा फायदा होण्यासह केस वाढण्यास मदत होते.

पोषण मिळते
प्लास्टिकच्या कंगव्याऐवजी लाकडाचा कंगव्याचा वापर केल्यास केसांच्या मुळांमध्ये असलेले नैसर्गिक तेल केसांमध्ये समप्रमाणात मिक्स होते. यामुळे केस तुटणे किंवा गळण्याची समस्या कमी होते. याशिवाय केस हेल्दी, चमकदार आणि घनदाट होतात.

केस गळती कमी होते
प्लास्टिकच्या तुलनेत लाकडाचा कंगवा वापरल्याने केस गळतीची समस्या कमी होते. लाकाडाच्या कंगव्याचे दात हे मऊ आणि आकाराने रुंद असतात. यामुळे केसांमध्ये गुंता झाल्यास तरीही तो सहज सोडवला जाऊ शकतो. 

कोंडा कमी होतो
लाकडाचा कंगवा वापरल्याने कोंड्याची समस्या कमी होते. मार्केटमध्ये विविध प्रकारचे लाकडाचे कंगवे मिळतात. चंदन, कडुलिंबाच्या झाडापासून तयार करण्यात आलेला कंगवा वापरल्यास नक्कीच तुम्ही कोंड्याच्या समस्येपासून दूर राहू शकता.याशिवाय टाळूच्या संसर्गाची समस्याही दूर होते.

अ‍ॅलर्जीची समस्या
तुमच्या केसांची मुळं संवेदनशील असल्यास प्लास्टिकऐवजी लाकडी कंगव्याचा वापर करा. कडुलिंबाच्या झाडाचा लाकडी कंगवा असल्यास तुम्ही अ‍ॅलर्जीच्या समस्येपासून दूर राहू शकतात. कडुलिंबात अँन्टी-बॅक्टेरियल गुणधर्म असतो. यामुळे केसांसंबंधित काही समस्या दूर होण्यास मदत होते. 

तज्ज्ञांचा सल्ला
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा: 

सुटलेले पोट कमी करण्यासाठी इडलीच्या या रेसिपी घरी नक्की ट्राय करा

सोन्याची Nose Ring घालण्याचे हे आहेत 7 आश्चर्यकारक फायदे

ऑफिसमध्ये सतत बसून राहिल्याने वजन वाढलेय? करा या सोप्या Exercise