ऑफिसमध्ये सतत बसून राहिल्याने वजन वाढलेय? करा या सोप्या Exercise
ऑफिसमध्ये सतत खुर्चीवर बसून राहण्याऐवजी एक्सरसाइज बॉलचा थोडावेळ बसण्यासाठी वापर करू शकता. यामुळे तुमच्या शरीराचे पोश्चर व्यवस्थितीत राहण्यास मदत होते.
शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत सुरू राहण्यासाठी आणि कॅलरीज् कमी होण्यासाठी कामामधून थोडावेळ ब्रेक घ्या. ब्रेक दरम्यान, स्ट्रेचिंग करा. यामुळे स्नायूंना आराम मिळेल.
संपूर्ण दिवसातून थोडावेळ ऑफिसमध्ये मेडिटेशन करा. डेस्कवर बसूनही तुम्ही मेडिटेशन करू शकता. यामुळे शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होण्यास मदत होईल.
लिफ्टचा वापर करण्याएवजी शक्यतो पायऱ्यांचा वापर करा. यामुळे शरीरातील कॅलरीज् बर्न होण्यास मदत होईल.
आपल्या शरीरातील स्नायू अॅक्टिव्ह राहण्यासाठी लेग लिफ्ट, चेअर स्क्वॉट्स आणि डेस्क पुश अप्स सारख्या सोप्या एक्सरसाइज करू शकता.
हाइड्रेट राहिल्याने तुम्ही हेल्दी रहाल. याशिवाय शरीरातील चयापचयाची क्रियाही सुरळीत राहिल.
ऑफिसमध्ये बसून काम करत असाल तर थोडावेळ उभे राहा. यादरम्यान, स्ट्रेचिंग किंवा थोडावेळ चाला. यामुळे सतत बसून पाठ दुखीची समस्या दूर होईल.
लिफ्टचा वापर करण्याएवजी शक्यतो पायऱ्यांचा वापर करा. यामुळे शरीरातील कॅलरीज् बर्न होण्यास मदत होईल.
एखाद्याशी फोनवर बोलताना बसून बोलण्याऐवजी चालत बोला. यामुळे कॅलरीज् बर्न होण्यास मदत होईल.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.