सुटलेले पोट कमी करण्यासाठी इडलीच्या या रेसिपी घरी नक्की ट्राय करा
पारंपरिक पद्धतीची इ़डली ही नरम, फुललेली आणि वजनाने हलकी असते. इडली तांदूळ आणि उडदाची डाळ यांच्या मिश्रणापासून तयार केली जाते. ही इडली नारळाची चटणी आणि सांबारसोबत सर्व्ह केली जाते.
कांचीपुरम इडलीमध्ये काळी मिरी आणि जीरे मिक्स केले जाते. याशिवाय आल्याचा वापरही या इडलीमध्ये केला जातो. तसेच ही इडली पारंपारिक रूपात केळीच्या पानांमध्ये शिजवली जाते.
रवा इडली इन्स्टंट आणि चविष्ट रेसिपी आहे. याची चव पारंपारिक इडलीपेक्षा फार वेगळी लागते. रवा इडलीसोबत तुम्ही हिरव्या मिर्चीची चटणी खाऊ शकता.
पौष्टिक अशी पोहा इडली तुम्ही सुटलेले पोट कमी करण्यासाठी खाऊ शकता. पोहा इडली पचनास हलकी असते. पोहा इडली तुम्ही टोमॅटोच्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता.
हेल्दी आणि पौष्टिक अशी ओट्स इडली वजन कमी करणे ते सुटलेले पोट कमी करण्यास फायदेशीर ठरेल. ओट्स हे पचनासाठी हलके असते. यामुळे तुम्ही डाएटमध्ये ओट्स इडलीचा समावेश करू शकता.
व्हेजिटेबल इडलीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या- गाजर, बीट, ढोबळी मिर्चीचा वापर करून तयार करू शकता. या इडलीमुळे तुमचे पोट भरलेले राहिल आणि पोषण तत्त्वेही शरीराला मिळतील.
बीटाचा वापर करून तुम्ही इडली तयार करू शकता. लाल रंगाची दिसणारी ही इडली अत्यंत पौष्टिक असते. बीटामध्ये अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे तुम्हाला सुटलेले पोट कमी करण्यास मदत करतात.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा