MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Calcium deficiency: वयाच्या तिशीनंतर महिलांची हाडे होतात कमकुवत, मजबूत हाडांसाठी आहारात हे घ्या

Calcium deficiency: वयाच्या तिशीनंतर महिलांची हाडे होतात कमकुवत, मजबूत हाडांसाठी आहारात हे घ्या

निरोगी शरीर हवे असेल तर व्यायामाबरोबरच निरोगी आहाराची आवश्यकता असते. विशेषत: वयाच्या तिशीनंतर तर स्त्रियांना अधिक पोषण मिळणे आवश्यक असते. ज्यामध्ये कॅल्शियम हे अत्यंत महत्वाचे पोषकतत्व आहे.

2 Min read
vaidehi raje
Published : Feb 03 2024, 08:27 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
कॅल्शियमची कमतरता ठरते हानिकारक
Image Credit : freepik

कॅल्शियमची कमतरता ठरते हानिकारक

निरोगी शरीर हवे असेल तर व्यायामाबरोबरच निरोगी आहाराची आवश्यकता असते. विशेषत: वयाच्या तिशीनंतर तर स्त्रियांना अधिक पोषण मिळणे आवश्यक असते. ज्यामध्ये कॅल्शियम हे अत्यंत महत्वाचे पोषकतत्व आहे. कॅल्शियम आपल्या हाडांना मजबूत ठेवते आणि पेशींच्या निर्मितीमध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावते.

27
शरीरासाठी अत्यंत आवश्यक कॅल्शियम
Image Credit : freepik

शरीरासाठी अत्यंत आवश्यक कॅल्शियम

कॅल्शियम हाडे आणि दात मजबूत ठेवण्यास मदत करते. एवढेच नव्हे तर स्नायूंचे कार्य योग्य प्रकारे होण्यासाठी देखील कॅल्शियम आवश्यक आहे. चला जाणून घेऊया ३० वर्षांनंतरच्या महिलांनी कॅल्शियमसाठी त्यांच्या आहारात काय घ्यावे.

37
दुग्धजन्य पदार्थ
Image Credit : freepik

दुग्धजन्य पदार्थ

दूध, दही, चीजमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. शरीरातील कॅल्शियमची दैनंदिन गरज पूर्ण करण्यासाठी दररोज एक ग्लास दूध प्यावे. जर तुम्हाला नुसते दुध पचत नसेल असेल तर दही आणि चीजचा आहारात समावेश करा.

47
भाज्या व हिरव्या पालेभाज्या
Image Credit : freepik

भाज्या व हिरव्या पालेभाज्या

तुम्हाला दूध व दुग्धजन्य पदार्थांची अ‍ॅलर्जी असेल तर ब्रोकोली, भेंडी, कोबी, ग्रीन कोलार्ड, पालक आणि बोक चॉयमध्येही कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. रोजच्या आहारात त्यापासून बनवलेले पदार्थ जरूर खा.

57
मासे
Image Credit : freepik

मासे

जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुमच्या आहारात माशांचा नक्कीच समावेश करा. माशांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.

67
सुकामेवा व बिया
Image Credit : freepik

सुकामेवा व बिया

बदाम, चिया सीड्स, तीळ, काजू इत्यादींसह अनेक बिया आहेत ज्यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. मधल्या वेळात भूक लागल्यास स्नॅक म्हणून देखील तुम्ही यांचे सेवन करू शकता. पण यांचे सेवन योग्य प्रमाणातच करावे.

77
कॅल्शियमचे इतर सोर्स
Image Credit : freepik

कॅल्शियमचे इतर सोर्स

तुम्ही सोया मिल्क, बदाम मिल्क, ओट्स मिल्क मध्येही कॅल्शियम असते. तुम्हाला दुध पचत नसल्यास तुम्ही या पर्यायांची निवड करू शकता. तसेच संत्र्याचा रस, सुके अंजीर, मसूर आणि सोयाबीनचे सेवन देखील फायदेशीर ठरते.

कॅल्शियमच्या कमतरतेचे तोटे

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे, ऑस्टियोपोरोसिसचा धोका सर्वाधिक असतो, ज्यामध्ये हाडे खूप कमकुवत होतात व थोड्या धक्क्याने देखील हाड फ्रॅक्चर होण्याची भीती असते. हा आजार सर्वाधिक प्रमाणात महिलांमध्ये दिसून येतो. म्हणूनच महिलांनी कॅल्शियमच्या कमतरतेकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे.

आणखी वाचा -

Winter Special Hair Oil : लांबसडक, घनदाट व काळेभोर केस हवे आहेत? वापरा हे नैसर्गिक तेल VIDEO

Hair Care : या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे गळताहेत तुमचे केस, टक्कल पडण्यापूर्वीच व्हा सावध

नाश्तामध्ये खा हे 7 प्रकारचे हेल्दी चीला

About the Author

VR
vaidehi raje
Recommended Stories
Related Stories
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved