- Home
- lifestyle
- Hair Care : या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे गळताहेत तुमचे केस, टक्कल पडण्यापूर्वीच व्हा सावध
Hair Care : या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे गळताहेत तुमचे केस, टक्कल पडण्यापूर्वीच व्हा सावध
Hair Care Tips : धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे हल्ली बरेचजण केसगळतीच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. पौष्टिक आहाराच्या अभावामुळे केस गळणे व केस तुटणे यासारख्या समस्या उद्भवत आहेत, हे लक्षात घ्या मंडळींनो. या समस्येतून कशी मिळवावी सुटका? जाणून घ्या सविस्तर…
| Published : Dec 01 2023, 01:43 PM IST / Updated: Dec 01 2023, 01:47 PM IST
- FB
- TW
- Linkdin
पौष्टिक आहाराचा अभाव?
Hair Growth Tips In Marathi : डाएटमुळे आपल्या आरोग्यावर सकारात्मक तसेच नकारात्मकही परिणाम होतात, यामध्ये केस व त्वचेच्या आरोग्याचाही समावेश असतो; हे विसरू नका. आपण देखील केसगळती तसेच केस तुटण्याच्या (Hair Loss) समस्येमुळे त्रस्त आहात का?
तर यामागील मुख्य कारण पौष्टिक आहाराचा (Healthy Diet) अभाव व शरीरातील व्हिटॅमिन्सची कमतरता असू शकते. प्रोटीन, लोहासह व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळेही केसांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे टक्कल पडण्यापूर्वीच वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधोपचार करा.
व्हिटॅमिन्सची कमतरता केसगळतीसाठी कशी ठरू शकते कारणीभूत?
केसांच्या रोमछिंद्रांचे आरोग्य व केसांच्या वाढीमध्ये जीवनसत्त्व-खनिजे महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. दुसरीकडे शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता तसेच प्रमाण वाढल्यासही केस गळण्याची समस्या उद्भवते. याशिवाय लोह व प्रोटीनच्या कमतरतेमुळेही केस पातळ होऊ लागतात.
व्हिटॅमिन B, बायोटिन आणि फॉलिक अॅसिड
शरीराची अनेक कार्य सुरळीत पार पाडण्यामध्ये ‘व्हिटॅमिन B’ महत्त्वाची भूमिका बजावते. बायोटिन हे देखील एक प्रकारचे ‘व्हिटॅमिन B’ (B7) आहे, जे अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर करणे आणि पेशींशी संबंधित कार्य योग्यरित्या पार पाडण्यास मदत करते. केसगळतीमागील मुख्य कारण बायोटिनची कमतरता असू शकते.
व्हिटॅमिन D
‘व्हिटॅमिन D’मुळे शरीराची हाडे मजबूत होण्यास मदत मिळू शकते. पण ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेमुळे काही जणांना केसगळतीचाही (Hair Growth Tips) अनुभव येऊ शकतो. ही समस्या टाळण्यासाठी ‘व्हिटॅमिन डी’युक्त आहाराचे सेवन करावे.
व्हिटॅमिन C
शरीरात ‘व्हिटॅमिन C’ची (Vitamin C) कमतरता निर्माण झाल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. ज्यामुळे अशक्तपणा वाढतो. याचा परिणाम केसांच्या आरोग्यावरही पाहायला मिळतो. केसगळती मोठ्या प्रमाणात होत असेल तर डाएटमध्ये लिंबूवर्गीय फळांचा समावेश करण्यावर भर द्यावा. यामुळे शरीरातील ‘व्हिटॅमिन सी’ची कमतरता भरून निघण्यास मदत मिळेल.
लोह
शरीरातील लाल रक्तपेशींचे आरोग्य निरोगी ठेवण्यामध्ये ‘लोह’ हे घटक (Iron) महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. लोह आपल्या शरीरात ऑक्सिजन वायू वाहून नेण्याचेही कार्य करते. आहारात पुरेशा प्रमाणात लोहाचा समावेश नसल्यास अशक्तपणा जाणवू शकतो तसेच शरीरातील लाल रक्तपेशींची संख्या कमी होऊ शकते. यामुळेही केसगळतीची समस्या उद्भवू शकते.
केसगळती, केस तुटणे, केस पातळ होणे या समस्यांपासून सुटका हवी असल्यास पौष्टिक आहाराचे सेवन करा. ज्यामुळे केस घनदाट व सुंदर होण्यास नक्कीच मदत मिळेल.
तज्ज्ञांचा सल्ला
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा :
Hair Care : लांबसडक, मऊ व मजबूत केस हवेत? वापरा किचनमधील या साहित्यापासून तयार केलेले औषधी पाणी
White Hair Solution : पांढऱ्या केसांपासून हवीय मुक्तता? मग करा हे आयुर्वेदिक उपाय