नाश्तामध्ये खा हे 7 प्रकारचे हेल्दी चीला
बेसनच्या पीठामध्ये बारीक चिरलेला पालक, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ व लाल तिखट मिक्स करून घ्या. या मिश्रणाला तव्यावर गोल आकारात तव्यावर पसरवून पालक चीला तयार करा.
बारीक रव्यामध्ये दही, पाणी, मीठ, हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिक्स करा. तव्यावर तेल गरम करून त्यावर चीलाचे मिश्रण पसरवा. मध्यम आचेवर रव्याचा चीला दोन्ही बाजूने व्यवस्थितीत भाजून घ्या.
बेसच्या पीठात मक्याचे पीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ मिक्स करुन घ्या. चीलाचे मिश्रण गरम तव्यावर पातळ लेअरमध्ये पसरवून घ्या. जेणेकरुन मक्याच्या पीठाचा चीला मऊसर होईल.
बेसनच्या पीठात टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर व मीठ मिक्स करा. गरम तव्यावर तेलाचे काही थेंब टाकत चीलाचे मिश्रण पसरवून घ्या. टोमॅटो-कांद्याचा हेल्दी चीला नाश्तावेळी खाऊ शकता.
बेसनच्या पीठात चिरलेली ढोबळी मिरची, गाजर, मटार, कांदा, कोथिंबीर, मीठ मिक्स करा. हे मिश्रण तव्यावर मध्यम आचेवर शिजवून घ्या. अशाप्रकारे नाश्तासाठी मिक्स व्हेज चीला तयार करा.
बेसनच्या पीठात किसलेला पनीर, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ मिक्स करा. यामध्ये आमचूर पावडरही मिक्स करू शकता. गरम तव्यावर मिश्रण पसरवून हेल्दी पनीर चीला तयार करा.
बेसनाच्या पीठात बारीक चिरलेली ब्रोकोली, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ मिक्स करून घ्या. मिश्रण पाच मिनिटानंतर तव्यावर गोल आकारात पसरवून ब्रोकोली चीला तयार करा.