सार

Winter Special Hair Oil : काळेभोर व सुंदर केस मिळवण्यासाठी आपण देखील आतापर्यंत भरपूर उपाय केले आहेत? पण केसगळती, कोंडा यासारख्या समस्यांपासून सुटका मिळाली नाही? तर मग घरच्या घरी केसांसाठी तेल कसे तयार करावे? जाणून घेऊया…

Winter Special Hair Oil : केस लांबसडक व घनदाट दिसावेत, यासाठी महिलावर्ग ब्युटी पार्लर ट्रीटमेंट तसेच कित्येक घरगुती उपाय देखील करतात. पण केसांशी संबंधित (Hair Care Tips) समस्या काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. 

केमिकलयुक्त शॅम्पू, कंडिशनर किंवा वेगवेगळ्या ट्रीटमेंटमुळे केसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. यामुळे केस तुटणे, केसगळती, कोंडा यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

त्यामुळे केमिकलयुक्त ट्रीटमेंटऐवजी घरच्या घरी नैसर्गिक सामग्रींपासून तेल तयार करा आणि केसांसाठी वापरा. यामुळे केसांना (Beauty Tips In Marathi) खोलवर पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल. ज्यामुळे केसगळती, कोंडा, केस पातळ होणे सारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळू शकेल. चला तर मग जाणून घेऊया घरच्या घरी केसांसाठी कसे तयार करावे तेल? (Winter Special Hair Oil)

सामग्री

नारळाचे तेल, काळे तीळ, मेथीच्या बिया, अळशीच्या बिया, लवंग, छोट्या आकारातील कांदे, आवळा, तुळशीची पाने, जास्वंदाच्या रोपाची पाने, दुर्वा, गुलाब फुलाच्या पाकळ्या, कोरफड, कढीपत्ता, कडुलिंबाची पाने, विड्याची पाने

वरील सर्व सामग्रीचे प्रमाण आपण आपल्या आवश्यकतेनुसार ठरवा.

तेल कसे तयार करावे?

  • एका कढईमध्ये नारळाचे तेल गरम करत ठेवा.
  • तेल थोडेसे गरम झाल्यानंतर त्यामध्ये काळे तीळ, मेथीच्या बिया, अळशीच्या बिया, लवंग मिक्स करा.
  • एक चमच्याने सर्व सामग्री ढवळावी.
  • यानंतर कांदे, आवळ्याचे काप, तुळशीची पाने, जास्वंदाच्या रोपाची पाने, दुर्वा, गुलाब फुलाच्या पाकळ्या, कोरफड, कढीपत्ता, कडुलिंबाची पाने, विड्याची पाने तेलामध्ये मिक्स करा.
  • आता या सर्व सामग्रीचा रंग चॉकलेटी होईपर्यंत तेल गरम करावे.
  • तेल तयार झाल्यानंतर गॅस बंद करा व तेल (Winter Special Hair Oil) थंड होण्यास ठेवून द्या.
  • तेल थंड झाल्यानंतर एका काचेच्या अथवा प्लास्टिकच्या बाटलीमध्ये तेल गाळून भरावे.
  • आठवड्यातून दोन ते तीन वेळा तेल (Winter Special Hair Oil) केसांवर लावा व हलक्या हाताने मसाज करावा.
  • यानंतर सौम्य शॅम्पूने केस व्यवस्थित स्वच्छ धुवावेत.
View post on Instagram
 

Video Credit Instagram@ Delish Bowl

तज्ज्ञांचा सल्ला Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा

Hair Care : या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे गळताहेत तुमचे केस, टक्कल पडण्यापूर्वीच व्हा सावध

White Hair Solution : पांढऱ्या केसांपासून हवीय मुक्तता? मग करा हे आयुर्वेदिक उपाय

Hair Growth Tips : केसगळतीपासून ते कोंड्यापर्यंत सर्व समस्या होतील दूर, केसांसाठी वापरा ही हिरवीगार पाने