WWEच्या रिंगणामध्ये सलवार-सूट परिधान करून कुस्ती करणाऱ्या लेडी खली, कोण आहेत कविता देवी?

| Published : Jan 02 2024, 12:03 PM IST / Updated: Jan 02 2024, 12:09 PM IST

Kavita Devi
WWEच्या रिंगणामध्ये सलवार-सूट परिधान करून कुस्ती करणाऱ्या लेडी खली, कोण आहेत कविता देवी?
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

WWEच्या रिंगणामध्ये सलवार-सूट परिधान करून कुस्ती खेळणाऱ्या लेडी खली कविता देवी यांची आपली कुस्तीच्या क्षेत्रात एक वेगळी ओखळ निर्माण केली आहे. जाणून घेऊया भारतातील ‘लेडी खली’ म्हणून ओखळल्या जाणाऱ्या कविता देवी यांच्याबद्दल अधिक....

Indian Leady Khali : WWEच्या रिंगणामध्ये बहुतांश भारतीय पुरुषांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण काही महिलांनी देखील डब्लूडब्लूईच्या रिंगणामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यापैकीच एक म्हणजे लेडी खली (Leady Khali) नावाने ओळखल्या जाणाऱ्या कविता देवी. जाणून घेऊया कोण आहेत कविता देवी? त्यांच्या डब्लूडब्लूईमधील प्रवासबद्दल सविस्तर...

पहिली भारतीय महिला पैलवान
कविता देवी (Kavita Devi) या डब्लूडब्लूईच्या रिंगणामध्ये पाऊल ठेवणाऱ्या पहिला भारतीय महिला पैलवान आहेत. 20 सप्टेंबर, 1987 मध्ये हरियाणा राज्यात कविता देवी यांचा जन्म झाला. कविता देवी यांना कविता दलाल नावानेही ओळखळे जाते.

कविता देवी यांनी कुस्तीच्या जगात आपली एक वेगळी ओखळ निर्माण केली आहे. कविता यांना कुस्तीच्या क्षेत्रात अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. कुस्तीमध्ये आपले करियर करण्याचे कविता देवी यांनी स्वप्न पाहिले होते. वर्ष 2017 मध्ये कविता यांनी एमएई यंग क्लासिकच्या (Mae Young Classic) कुस्ती स्पर्धेत उत्तम खेळी करत प्रेक्षकांच्या मनात आपला ठसा उमटवला.

रेसलमेनिया 34 स्पर्धा
कविता देवी यांना रेसलमेनिया 34 (WrestleMania 34) मधील स्पर्धेदरम्यान यश मिळाले. यामुळे जागतिक स्तरावरील डब्लूडब्लूई पैलवांना कविता यांनी आपल्या विजयाने आश्चर्यचकित केले. कविता यांच्या विजयानंतर त्यांचे खूप कौतुक करण्यात आले.

YouTube video player

द ग्रेट खली यांचे मार्गदर्शन
वर्ष 2016 मध्ये दक्षिण आशियाई खेळांचे भारताचे प्रतिनिधत्व करणाऱ्या पॉवरलिफ्टर कविता यांना माजी डब्लूडब्लूई वर्ल्ड हेव्हीवेट चॅम्पियन, द ग्रेट खली (The Great Khali) (दलीप सिंह राणा) यांचे मार्गदर्शन मिळाले होते. खली यांच्यामुळे डब्लूडब्लूच्या रिंगणापर्यंत जाण्याची संधी मिळाल्याचे कविता यांनी म्हटले होते. माझ्या करियरला आकार देण्यामागे खली यांचा मोठा हात असल्याचेही कविता यांनी सांगितले होते. 

वर्ष 2021 पर्यंत WWEच्या सदस्याच्या रूपात काम
कविता यांनी वर्ष 2009 मध्ये विवाह केला. यानंतर एका वर्षांनी कविता यांनी पहिल्या बाळाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर कविता देवी यांनी कुस्तीमधून निवृत्त होण्याचा विचार केला होता. पण कविता यांच्या पतीने त्यांना कुस्तीसाठी नेहमीच पाठिंबा दिला. कविता यांनी वर्ष 2017 ते 2021 पर्यंत डब्लूडब्लूईच्या सदस्याच्या रूपात काम केले.

आणखी वाचा: 

तुमच्या मोबाइल क्रमांकामध्ये आहेत हे 2 अंक? खर्च होतील अधिक पैसे

पार्टीसाठी या साड्या तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्की असू द्या, दिसाल सुंदर

नवीन वर्षात लाँच होणार हे 5 धमाकेदार स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स