पार्टीसाठी या साड्या तुमच्या वॉर्डरोबमध्ये असू द्या, दिसाल सुंदर
Lifestyle Dec 31 2023
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
फ्रिल लेअर साडी
कॉकटेल पार्टीसाठी फ्रिल लेअरमधील काळ्या रंगाची साडी तुमच्या वॉर्डरोबमध्ये असू द्या. या साडीवर तुम्ही स्मोकी आय लुक मेकअप करू शकता.
Image credits: instagram
Marathi
नेट ब्लॅक साडी
नेट असणारी साडी प्रत्येकालाच सुंदर दिसते. मलाइकासारखी काळ्या रंगातील साडी तुम्ही लग्नसोहळा, पार्टी अथवा फंक्शनसाठी परिधान करू शकता. या साडीवर डायमंड, मोत्यांची ज्वेलरी सुंदर दिसेल.
Image credits: instagram
Marathi
बॉर्डर वर्क
तपकिरी रंगाची मोठी बॉर्डर असलेली साडी तुम्ही मकर संक्रातीसारख्या सणावेळी परिधान करू शकता. अशाप्रकारची साडी तुम्हाला दोन हजार रूपयांपर्यंत खरेदी करता येईल.
Image credits: instagram
Marathi
जॉर्जेट फॅब्रिक साडी
काजोलसारखी काळ्या रंगातील जॉर्जेट फॅब्रिक साडीत तुम्ही सुंदर दिसाल. यावर गडद रंगाचा एखादा ब्लाऊज परिधान करू शकता. हेव्ही मेकअप या साडीवर करू नका.
Image credits: instagram
Marathi
सॉफ्ट फॅब्रिक इंडो वेस्टर्न साडी
एलिगेंट लुकसाठी सॉफ्ट फॅब्रिक इंडो वेस्टर्न साडी परिधान करू शकता. ही साडी वजनाने फार हलकी असते आणि यामध्ये तुमचा लुक अधिक खुलला जातो. नाइट पार्टीसाठी अशाप्रकारची साडी परफेक्ट आहे.
Image credits: instagram
Marathi
गोल्डन अॅण्ड ब्लॅक डबल शेड साडी
गोल्डन अॅण्ड ब्लॅक डबल शेड साडी परिधान केल्यानंतर तुम्ही सुंदर दिसाल. अशाप्रकारची साडी तुम्ही पार्टी किंवा एखाद्या फंक्शनसाठी परिधान करू शकता. यावर मोठे झुमके सुंदर दिसतील.
Image credits: instagram
Marathi
लेहंगा स्टाइल साडी
एखाद्या पार्टीसाठी तुम्ही लेहंगा स्टाइल साडी परिधान करू शकता. सध्या या साडीचा ट्रेण्ड आहे. या साडीसोबत क्लच बॅग कॅरी करू शकता.