सार
तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? तर थांबा. कारण नववर्षात काही धमाकेदार फिचर्ससह स्मार्टफोन लाँच होणार आहे. हे स्मार्टफोन तुमच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीतही असणार आहेत. याबद्दल जाणून घेऊया अधिक...
Smartphone Launch in 2024 : नवा स्मार्टफोन घ्यायचा आहे किंवा जुना स्मार्टफोन देऊन नवा फोन खरेदी करायचा विचार करताय? तर जानेवारी (2024) महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात काही धमाकेदार स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत.
यामध्ये फ्लॅगशिप ते प्रीमियअम कॅटेगरीतील स्मार्टफोनचा समावेश असणार आहे. जाणून घेऊया नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात लाँच होणाऱ्या स्मार्टफोनबद्दल सविस्तर.....
नववर्षात हे स्मार्टफोन होणार लाँच
वर्ष 2024 च्या पहिल्या आठवड्यात रेडमी (Redmi) आणि वीवो (Vivo) ब्रॅण्डचे स्मार्टफोन लाँच होणार आहे. येत्या 4 जानेवारीला (2024) Redmi Note 13 सीरिज लाँच केली जाणार आहे. यावेळी एकत्रित तीन स्मार्टफोन मार्केटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
यामध्ये Redmi Note 13, Redmi Note 13 Pro आणि Redmi Note 13 Pro Plus या स्मार्टफोनचा समावेश आहे. याच दिवशी Vivo X100 सीरिजही लाँच केली जाणार आहे. या सीरिजमध्ये Vivo X100 आणि Vivo X100 Pro स्मार्टफोन लाँच केले जातील.
Redmi Note 13 स्मार्टफोनचे फिचर्स
रेडमीचे तिन्ही स्मार्टफोन 6.67 इंचाच्या 1.5K एफएचडी प्लस एमोलेड डिस्प्लेसह येऊ शकतात. प्लस मॉडेलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. याव्यतिरिक्त स्मार्टफोनसाठी 5000mAh ची बॅटरी, 120 W फास्ट चार्जिंगसह मिळणार आहे.
प्रो मॉडेलसाठी स्नॅपड्रॅगन 8th Generation 2 SOC आणि प्लस मॉडेलमध्ये MediaYek Dimensity 7200 Ultra चा सपोर्ट कंपनी देणार आहे. बेस मॉडेलमध्ये Dimensity 6080 चिपसेट दिली जाऊ शकते.
Vivo X100 सीरिज स्मार्टफोन फिचर्स
वीवो स्मार्टफोनच्या Vivo X100 आणि Vivo X100 Pro स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 9300 SoC चिपसेटसोबत लाँच होणार आहेत. Vivo X100 आणि X100 Pro स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा OLED LTPO कर्व्ड डिस्प्ले 120hz चा रिफ्रेश रेट आणि 3000 Nits Peak Brightness मिळण्याची शक्यता आहे. बेस मॉडेलमध्ये 5000mAhची बॅटरी 120W फास्ट चार्जिंगसह येणार आहे. तर प्रो मॉडेलमध्ये 5000mAhची बॅटरी 100W चार्जिंगसह येऊ शकते.
आणखी वाचा:
इंटरनेटशिवाय UPIच्या माध्यमातून करता येईल 5 लाख रूपयांपर्यंतचे पेमेंट, जाणून घ्या सोपी ट्रिक
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही कामे करणे टाळा, अन्यथा....
कमी खर्चात युरोपात फिरण्यासाठी या 10 गोष्टी नक्की लक्षात ठेवा