Belly Fat Loss : बेली फॅट कमी करायचंय? मग या 3 आसनांचा नियमित करा सराव
Weight Loss Tips : पोटावरील तसंच कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी कोणकोणत्या आसनांचा सराव केल्यास मदत मिळू शकते, जाणून घेऊया सविस्तर…
| Published : Oct 19 2023, 02:24 PM IST / Updated: Oct 26 2023, 10:54 PM IST
- FB
- TW
- Linkdin
ढेरी सुटलीय का?
Belly Fat Loss Tips : तुमचेही पोट सुटतच चाललंय का? सुटलेल्या पोटामुळे चालताना-फिरताना-बसताना फार अडचणी निर्माण होत आहेत? तर मंडळींनो तुमच्या शरीराचे वजन आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात वाढलंय, हे लक्षात घ्या. शरीराचे वजन वाढल्यास अन्य गंभीर आजारांनाही आयते निमंत्रण मिळते, हे तुम्हाला माहिती असेलच.
आसनांचा करा सराव
त्यामुळे वेळीच या समस्येवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात करा. पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी (How to lose belly fat with yoga for beginners) करण्यासाठी कोणकोणत्या आसनांचा सराव करणे फायदेशीर ठरू शकते, याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.
(जॉगिंगपूर्वी व जॉगिंगनंतर काय खावे आणि खाऊ नये? जाणून घ्या सविस्तर)
ताडासन (Tadasana)
पोटावरील अतिरिक्त चरबी कमी (How to lose belly fat with yoga asanas) करण्यासाठी सर्वात सोपा व प्रभावी उपाय म्हणजे ताडासनाचा सराव करणे. या आसनामुळे संपूर्ण शरीर ताणले (Stretch) जाते. ज्यामुळे रक्तप्रवाहाची प्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते.
ताडासनाचा सराव कसा करावा? (How To Practice Tadasana)
- सर्वप्रथम मॅटवर सरळ उभे राहा. दोन्ही पाय, कंबर आणि मान सरळ ठेवा. दोन्ही हात सावधान स्थितीत ठेवा.
- तोल जात असल्यास आपण दोन्ही पायांमध्ये थोडेसे अंतर ठेवू शकता.
- आता दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या वर न्यावेत. शक्य असेल तितके हात व संपूर्ण शरीर वरील बाजूस स्ट्रेच करा.
- शक्य असल्यास पायांच्या टाचा देखील किंचितशा वर उचला व पायांच्या बोटांवर शरीराचा भार येऊ द्यावा.
- ही झाली ताडासनाची अंतिम स्थिती. या स्थितीत संपूर्ण शरीर ताणले जाते.
- आपल्या क्षमतेनुसार ताडासनाच्या अंतिम स्थितीमध्ये राहावे आणि ज्या पद्धतीने आसन धारण केले होते, त्याच उलट क्रमाने आसनातून बाहेर यावे.
ताडासनाचे लाभ (Benefits Of Tadasana)
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ताडासनाच्या सरावामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत मिळू शकते. शिवाय शरीर सुडौल होण्यासही मदत मिळते. पाठदुखी, कंबरदुखीची समस्या कमी होते. स्नायूदुखी, पायांचे दुखणे, गुडघेदुखीही कमी होण्यास मदत मिळू शकते.
(सावधान ! तुम्हीही उभे राहून पाणी पिताय? होतील इतके गंभीर परिणाम)
पादहस्तासन (Padahastasana)
पादहस्तासनाचा नियमित अभ्यास केल्यास पोटावरील अतिरिक्त चरबी (weight loss tips news) लवकरात लवकर कमी होण्यास मदत मिळू शकते. शिवाय यामुळे कमरेच्या भागातील हाडे, पाठीचा कणा देखील लवचिक होऊ शकतात.
पादहस्तासनाचा कसा करावा सराव? (How To Do Padahastasana)
- योग मॅटवर उभे राहा. दोन्ही पायांमध्ये किंचितसे अंतर ठेवा. हात शरीरालगत सरळ ठेवा.
- आता श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुरू ठेवत दोन्ही हात वरील दिशेला न्या आणि हळूहळू लयबद्ध पद्धतीने हात जमिनीच्या दिशेने खाली आणा.
- खालील बाजूस झुकावे आणि दोन्ही हात जमिनीवर ठेवा.
- आपल्या कपाळाने गुडघ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा. ही झाली पादहस्तासनाची अंतिम स्थिती
- हाताचे पंजे जमिनीवर टेकत नसतील आणि कपाळाने गुडघ्यांना स्पर्श करणे कठीण होत असेल, तर हरकत नाही.
- आपण ज्या स्थितीमध्ये आहात, त्या स्थितीत आपल्या क्षमतेनुसार राहावे.
- या स्थितीत असताना पाय गुडघ्यांमध्ये वाकवू नका. पाय सरळ ठेवण्याचाच प्रयत्न करावा.
पादहस्तासनामुळे मिळणारे लाभ (Padahastasana Benefits)
पाठ, नितंब, मांड्यांच्या स्नायूंचा (health tips news) चांगला व्यायाम होतो. डोकेदुखी, पाठदुखीच्या समस्यांपासून मुक्तता मिळते. मानसिक तणाव कमी होण्यास मदत मिळते. पचनसंस्थेचं कार्य सुधारते. पोट व कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते.
धनुरासन (Dhanurasana)
धनुरासनामध्ये पोटावर ताण येत असल्याने पोटाच्या भागातील अवयवांचा चांगला व्यायाम होतो. महत्त्वाचे म्हणजे सुटलेले पोट (weight loss tips in marathi) देखील कमी होण्यास मदत मिळते. या आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो, त्यामुळे यास ‘धनुरासन’ असे म्हटले जाते.
धनुरासनाचा कसा करावा सराव? (Dhanurasana Steps)
- योग मॅटवर पोटाच्या दिशेने झोपा आणि श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुरू ठेवत दोन्ही पाय गुघड्यांमध्ये मोडा आणि आपल्या हाताच्या बोटांनी पायांच्या टाचा पकडण्याचा प्रयत्न करा.
- यानंतर डोके, छाती आणि मांड्यांचा भाग (yoga to reduce thigh fat) वरील दिशेला उचलण्याचा प्रयत्न करा.
- आपल्या क्षमतेनुसार आसनाची अंतिम स्थिती धारण करण्याचा प्रयत्न करावा.
- अंतिम स्थितीमध्ये पोटावर ताण येईल.
- यानंतर हळूहळू धनुरासनाच्या (Bow Pose) अंतिम स्थितीतून बाहेर यावा. शरीराला झटके देऊ नये.
धनुरासनाच्या सरावामुळे मिळणारे लाभ (Dhanurasana Benefits)
कंबरदुखी, पोटदुखी यासारख्या समस्यांतून सुटका मिळू शकते. शरीराचे स्नायू मजबूत होतील आणि शरीर लवचिक होण्यासही मदत मिळेल. पोट आणि कमरेवरील फॅट्स (how to lose weight fast naturally and permanently) देखील कमी होऊ शकतात.
(सकाळी 12 सूर्य नमस्काराचा करा सराव, संपूर्ण शरीराला मिळतील हे लाभ)
तज्ज्ञांचा सल्ला
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.