तुम्हीही उभे राहून पाणी पिताय? होतील इतके गंभीर परिणाम
आपल्या आसपासच्या कित्येकांना आपण उभे राहून पाणी पिताना पाहिले असेलच. पण उभे राहून पाणी पिण्याची सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
पाणी नेहमी एका जागी बसून प्यावे, असा सल्ला आपण वडिलधाऱ्यामंडळींकडून ऐकला असेलच. उभे राहून पाणी प्यायल्याने संपूर्ण शरीरावर वाईट परिणाम होतात.
उभे राहून पाणी प्यायल्याने तहान भागत नाही. तहान पूर्ण करण्यासाठी एक-एक घोट पाणी प्यावे.
उभे राहून पाणी प्यायल्यास सांधेदुखी व हाडे दुखण्याची समस्या उद्भवू शकते. तसंच संधिवाताचीही समस्या निर्माण होऊ शकते.
उभे राहून पाणी प्यायल्यास, पाणी थेट पोटाच्या खालील भागामध्ये पोहोचते. यामुळे पाण्यातील घाण पित्ताशयात जमा होते. यामुळे किडनीचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते.
शरीराच्या पचनसंस्थेवरही दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे पचनशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
उभे राहून पाणी प्यायल्यास अन्ननलिका व श्वसननलिकेला ऑक्सिजन वायूच्या होणाऱ्या पुरवठा प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. याचा थेट परिणाम फुफ्फुस आणि हृदयाच्या आरोग्यावर होतो.
आरोग्यावर होणारे हे नुकसान टाळण्यासाठी एका ठिकाणी बसून एक-एक घोट घेत पाणी प्यावे. ज्यामुळे संपूर्ण शरीरास फायदे मिळतील.
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.