हाडांच्या आरोग्यासाठी बदामाचे दूध लाभदायक आहे. कारण बदामामध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअमचे प्रमाण चांगले असते. या पोषणतत्त्वांमुळे शरीराची हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.
बदामामध्ये ‘व्हिटॅमिन डी’ आणि ‘व्हिटॅमिन ई’चे प्रमाण खूप असते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यामध्ये हे घटक महत्त्वपूर्ण कामगिरी बजावतात.
डोळ्यांशी संबंधित समस्येने त्रस्त असाल तर बदामाचे दूध प्रभावी उपाय ठरू शकतो. कारण यामध्ये रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन ए व व्हिटॅमिन डी यासारखे पोषक घटक आहेत.
बदामाचे दूध प्यायल्यास शरीराच्या स्नायूंचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. यामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअमचे प्रमाण खूप असते. ज्यामुळे स्नायूंची कार्यप्रणाली सुधारण्यास मदत मिळते.
वजन कमी करण्यासाठी बदामाचे दूध फायदेशीर ठरू शकते. कारण यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते.
मधुमेहींसाठी बदामाचे दूध फायदेशीर ठरू शकते. कारण यामध्ये साखर व कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी असते. यातील फायबरमुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यासही मदत मिळू शकते.
त्वचेसाठी पोषक असणारे व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ईचे घटक बदामामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. 'व्हिटॅमिन डी' हानिकारक बॅक्टेरियांपासून त्वचेचं संरक्षण करण्याचे कार्य करते.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार बदामाचे दूध प्यायल्यास केसांचीही वाढ होण्यास मदत मिळू शकते. कारण केसांच्या वाढीस पोषक असणाऱ्या प्रोटीन, व्हिटॅमिनचा यामध्ये मोठा साठा आहे.
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.