Marathi

निरोगी आरोग्य

डाएट व एक्सरसाइज या दोन्ही गोष्टी निरोगी आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. व्यायाम केल्यानंतर आपण कोणकोणत्या पदार्थांचे सेवन करतोय, हे देखील फार महत्त्वाचे आहे.

Marathi

जॉगिंग

फिटनेससाठी जॉगिंग हा एक सर्वोत्तम व्यायाम आहे. यासाठी कोणत्याही उपकरणांची आवश्यकता भासत नाही. शिवाय यामुळे संपूर्ण शरीरावर सकारात्मक परिणाम होतात.

Image credits: Getty
Marathi

पौष्टिक आहार

जॉगिंग करण्यापूर्वी व केल्यानंतर कोणत्या पदार्थांचे सेवन करावे आणि कोणते पदार्थ खाणे टाळावे, हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया सविस्तर..

Image credits: Getty
Marathi

शरीराला ऊर्जा देणारा आहार

व्यायाम करण्यापूर्वी शरीराला ऊर्जा मिळेल अशाच आहाराचे सेवन करावे. उदाहरणार्थ कार्बोहायड्रेट, प्रोटीन, सोडियम, नायट्रेट, अँटी-ऑक्सिडंट्स, प्रोबायोटिक्सयुक्त पदार्थांचे सेवन करावे.

Image credits: Getty
Marathi

शरीरात ऊर्जा टिकून राहते

अशा पदार्थांचे सेवन केल्यास शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळेल. शिवाय आपल्याला व्यायाम करताना थकवाही येणार नाही.

Image credits: Getty
Marathi

जॉगिंगपूर्वी काय खावे?

इलेक्ट्रोलाइट, बीटरूट ज्युस, केळे, सफरचंद अशा स्वरुपातील खाद्यपदार्थांचे सेवन करावे. पचायला जड असतील असे पदार्थ खाणे टाळावे, कारण यामुळे व्यायामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.

Image credits: Getty
Marathi

जॉगिंग करण्यापूर्वी काय खाणे टाळावे?

मांसाहार, डेअरी प्रोडक्ट्स, अधिक फाइबरयुक्त खाद्यपदार्थ, चॉकलेट, कॉफी आणि चहा

Image credits: Getty
Marathi

जॉगिंग केल्यानंतर हे खाणे टाळा

जॉगिंग केल्यानंतरही काही पदार्थ टाळणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ शितपेय, सॅच्युरेटेड फॅट्सयुक्त पदार्थ, तळलेले पदार्थ, कॅफिनयुक्त पदार्थ इत्यादी.

Image credits: Getty
Marathi

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image Credits: Getty