सकाळी 12 सूर्य नमस्काराचा करा सराव, आरोग्यास मिळतील हे लाभ
Lifestyle Oct 26 2023
Author: Harshada Shirsekar Image Credits:Getty
Marathi
12 आसनांचा एक संच
सूर्य नमस्कार हा 12 आसनांचा एक संच आहे. या व्यायामाचा नियमित अभ्यास केल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. रोज सकाळी सूर्य नमस्काराचा सराव केल्यास शरीरास कित्येक लाभ मिळू शकतात.
Image credits: Getty
Marathi
वजन होईल कमी
वजन कमी करण्यासाठी सूर्य नमस्काराचा सराव करणे हा एक सर्वोत्तम उपाय आहे. याचा नियमित सराव केल्यास शरीराची चयापचयाची क्षमता वाढते, कॅलरीज् कमी होतात.
Image credits: Freepik
Marathi
पोटाच्या स्नायूंचा व्यायाम
सूर्य नमस्कारामुळे पोटाच्या स्नायूंचा चांगला व्यायाम होतो. सरावादरम्यान पोटाचा भाग ताणला जात असल्याने स्नायू मजबूत होतात.
Image credits: Getty
Marathi
तणाव होतो दूर
दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहावी, यासाठी नियमित सकाळी सूर्य नमस्काराचा सराव करावा. यामुळे मेंदू शांत राहतो आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात.
Image credits: Getty
Marathi
पचनप्रक्रिया
सूर्य नमस्कारामुळे पचनसंस्थेचं कार्य सुधारते. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह देखील वाढतो. यामुळे गॅस, बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटी यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
Image credits: Getty
Marathi
हाडे होतात मजबूत
हाडांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी नियमित सूर्य नमस्काराचा सराव करावा. या व्यायामामुळे शरीराचे स्नायू ताणले जातात, ज्यामुळे शरीर लवचिक होते.
Image credits: Getty
Marathi
त्वचेसाठी लाभदायक
सूर्य नमस्कारामुळे शरीरातील रक्तप्रवाह वाढतो. यामुळे संपूर्ण शरीराच्या त्वचेला पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
Image credits: Instagram
Marathi
मासिक पाळीचा त्रास होतो कमी
नियमित या व्यायामाचा अभ्यास केल्यास मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credits: Getty
Marathi
पाठीचा कणा होतो मजबूत
सूर्य नमस्काराचा नियमित सराव केल्यास पाठीचा कणा मजबूत होण्यास मदत मिळते. यामुळे पाठदुखी, मानदुखी, खांदेदुखी यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.