Vastu Tips : वास्तुशास्रात देवघरात कोणत्या रंगाचे वस्र वापरू नयेत याबद्दल काही नियम सांगितले आहेत. अन्यथा तुमच्या परिवारात अडचणी येऊ शकतात.
Vastu Tips : हिंदू धर्मात देवघराला अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. वास्तुशास्रानुसार, देवघरातील प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक उर्जेसोबत संबंध असतो. असातच देवासाठी वापरले जाणारे वस्र हे कोणत्या रंगाचे असावे हे फार महत्वाचे असते. जेणेकरुन तुमच्या घरावरही त्याचा सकारात्मक परिणाम होईल. याबद्दल वास्तूशास्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

देवघरात काळ्या रंगाचे वस्र टाळा
वास्तुशास्रानुसार, देवघरात काळ्या रंगाच्या वस्त्रांचा वापर करणे टाळा. काळा रंग नकारत्मकता, शोक याचे प्रतीक मानले जाते. यामुळे देवदेवतांच्या मुर्तीसाठी काळ्या रंगाचे वस्र वापरणे टाळा. याशिवाय देवघराच्या सजावटीसाठी काळ्या रंगाचे वस्रही वापरू नका.
शुभ रंग
देवघरात पिवळा, पांढरा, केशरी, लाल आणि गुलाबी रंगाचे वस्र वापरू शकता. पिवळा रंग ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. तर पांढरा रंग शांती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्र विशेष शुभ मानले जाते. या रंगांमुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते.
देवतांनुसार वस्त्रांचा रंग निवडावा?
वेगवेगळ्या देवतांसाठी वेगवेगळे रंग शुभ मानले जातात. भगवान गणेशासाठी लाल किंवा केशरी रंग, भगवान शिवासाठी पांढरा रंग, तर देवी दुर्गेसाठी लाल रंगाचे वस्त्र शुभ मानले जाते. पूजा करताना स्वच्छ आणि सुती वस्त्रांचा वापर करू शकता. तर फाटलेले आणि जुने वस्र देवघरात वापरणे टाळा.
या गोष्टींकडेही द्या लक्ष
देवघर नेहमी स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठेवावे. तुटलेल्या मूर्ती, कोमेजलेली फुले किंवा जुने पूजेचे साहित्य साठवून ठेवू नये. देवघरात स्वच्छता असल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते.
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)


