Kitchen Tips : उन्हाळ्याच्या दिवसात स्वयंपाकघरात दुर्गंधी येण्याच्या समस्येने त्रस्त आहात? करा हे सोपे उपाय

| Published : Mar 19 2024, 12:25 PM IST / Updated: Mar 19 2024, 12:28 PM IST

Kitchen Smell Home Remedies
Kitchen Tips : उन्हाळ्याच्या दिवसात स्वयंपाकघरात दुर्गंधी येण्याच्या समस्येने त्रस्त आहात? करा हे सोपे उपाय
Share this Article
 • FB
 • TW
 • Linkdin
 • Email

सार

घराची कितीही स्वच्छता राखली तरीही काही कोपरे अस्वच्छ असल्यासारखे वाटतात. अशातच स्वयंपाकघरातही दररोज आपण स्वच्छता केली तरीही कधीकधी दुर्गंधी येते. यावर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

Kitchen Tips :  स्वयंपाकघरात नेहमीच स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. अन्यथा अस्वच्छतेमुळे आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवू शकतात. पण बहुतांशवेळा असे होते की, तुम्ही स्वयंपाकघरात कितीही स्वच्छता केली तरीही दुर्गंधी (Bad Smell) येते. एखादा पदार्थ शिजवल्यानंतर किंवा अन्य एखाद्या कारणास्तव स्वयंपाकघरात दुर्गंधी येऊ लागते. तुम्हीही स्वयंपाकघरातील दुर्गंधीच्या समस्येने त्रस्त आहात का? पुढील काही टिप्स वापरू शकता.

 • स्वयंपाकघरातील अस्वच्छता दूर करा
  काहीवेळेस स्वयंपाकघारातून दुर्गंधी येण्यामागील कारण म्हणजे अस्वच्छता असू शकते. यामुळे स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी एक स्वच्छ कापड वेगळे ठेवा. याशिवाय स्वयंपाकघर स्वच्छ करताना पाण्यामध्ये व्हिनेगर मिक्स करू शकता. यामुळे स्वयंपाकघरातील फरशी आणि ओट्यावरील अस्वच्छतेसह दुर्गंधी दूर होईल.
 • सिट्रस स्प्रे तयार करा
  स्वयंपाकघरातील दुर्गंधी दूर करण्यासाठी घरच्याघरी सिट्रस स्प्रे (Citrus Spray) तयार करा. स्प्रे तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात लिंबू (Lemon) अथवा संत्र्याची (Orange) साल टाकून ती उकळवा. यानंतर पाण्यात दालचिनी पावडर मिक्स करा. मिश्रण थंड झाल्यानंतर ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. किचनमध्ये येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी तयार केलेला सिट्रस स्प्रे नक्कीच कामी येईल.
 • बेकिंग सोडा
  स्वयंपाकघरात आपण दररोज अन्नपदार्थ तयार करतो. यावेळी अन्नपदार्थाचे तेल किंवा फोडणी गॅस किंवा ओट्यावरील भिंतीवर उडली जाते. अशातच त्याची स्वच्छता न केल्यास कालांतराने दुर्गंधी येऊ लागते. स्वयंपाकघरातील दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा (Baking Soda) वापर करू शकता. ज्या ठिकाणाहून स्वयंपाकघरात दुर्गंधी येतेय तेथे बेकिंग सोडा स्प्रे करा. सातत्याने दोन-चार दिवस बेकिंग सोडा स्प्रे केल्याने स्वयंपाकघरातून येणारी दुर्गंधी कमी होईल.
 • मीठाचा वापर
  स्वयंपाकघरातील ओटा किंवा चॉपिंग बोर्डच्या माध्यमातून दुर्गंधी येत असल्यास मीठाचा (Salt) वापर करू शकता. यासाठी दुर्गंधी येणाऱ्या गोष्टींवर मीठ टाकून त्यावर लिंबूने घासा. अशातच स्वयंपाकघरातून येणारी दुर्गंधीची समस्या दूर होईल.
 • कचरा वेळोवेळी टाका
  उन्हाळ्यात खाण्यापिण्याच्या बऱ्याच गोष्टी लवकर खराब होतात. अशातच घरातील कचऱ्याच्या डब्यातील कचऱ्यातूनही काहीवेळेस दुर्गंधी येऊ लागते. कचऱ्याच्या माध्यमातून येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी तो वेळोवेळी टाका. याशिवाय उत्तम गुणवत्तेच्या कचऱ्याच्या पिशव्यांचा वापर करा. जेणेकरुन अन्नपदार्थांचे पाणी त्यामधून खाली पडले जाणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दररोज कचरा फेकल्यानंतर कचऱ्याचा डबा धुवा.

आणखी वाचा : 

कर्नाटकात फ्लॉवर मंच्युरिअन आणि कॉटन कँडीवर बंदी, आरोग्यासाठी हानिकारक असल्याने सरकारने घेतला निर्णय

Mumbai Vada Pav : मुंबईतील प्रसिद्ध स्ट्रीट फूड 'वडापाव' ला जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत मिळाले 19 वे स्थान

सिगरेटपेक्षा आठ पटींनी अधिक धोकादायक बिडी, आरोग्य तज्ज्ञांनी केला धक्कादायक खुलासा