सार
‘नो स्मोकिंग डे’ निमित्त दोन दिवसाआधी लखनऊमधील किंग जॉर्ज मेडिकल विद्यापीठात 18 व्या एका वैद्यकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, आरोग्य तज्ज्ञांनी बिडी संदर्भात एक धक्कादायक खुलासा केला आहे.
No Smoking Day : ‘नो स्मोकिंग डे’ प्रत्येक वर्षी 13 मार्चला साजरा केला जातो. या दिवशी नागरिकांना धूम्रपान करण्याचे नुकसान आणि त्यासंदर्भात जागृक करण्यासाठी काम केले जाते. दरम्यान, ‘नो स्मोकिंग डे’ च्या एका कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच लखनऊमधील (Lucknow) किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीत (King George's Medical University) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी आरोग्य तज्ज्ञांनी बिडी ही सिगरेटपेक्षा आठ पटींनी अधिक हानिकारक असू शकते असा धक्कादायक खुलासा केला आहे.
नागरिकांना बिडीबद्दल असा गैरसमज असतो की, त्यामध्ये तंबाखूचे प्रमाण कमी असते आणि सिगरेटपेक्षा अधिक हानिकारक नसते. आरोग्य तज्ज्ञांनुसार, बिडी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पानांचा प्रभाव आणि बिडी ओढताना घेतला जाणारा दीर्घ श्वास आरोग्यासाठी सिगरेटपेक्षा अधिक धोकादायक ठरतो.
दिल्लीतील वल्लभभाई पटेल चेस्ट इंस्टिट्युटचे (VPCI) माजी संचालक प्राध्यापक राजेंद्र प्रसाद यांनी बिडी आणि सिगरेटमधील तुलना दाखवून देणाऱ्या एका अभ्यासाच्या मदतीने माहिती दिली की, दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक आहेत. पण तंबाखूच्या चहूबांजूना पान लावून तयार केल्या जाणाऱ्या बिडीतून अधिक धुर निघतो.
बिडीमुळे फुफ्फुसांना त्रास
प्रोफेसर राजेंद्र प्रसाद यांनी पुढे म्हटले की, धूम्रान करणाऱ्या व्यक्तींना बिडी ओढण्यासाठी दीर्घ श्वास घ्यावा लागतो. यामुळे शरिरातील फुफ्फुसांमध्ये गंभीर त्रास निर्माण होऊ शकतो. बिडीमध्ये सिगरेटपेक्षा चारपट कमी तंबाखू असला तरीही बिडी तेवढीच आरोग्यासाठी हानिकारक आहे.
किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीत आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध डॉक्टरांनी छातीचे एक्स-रे बद्दल अधिक माहिती देण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर एक व्याखान दिले. यावेळी नॉर्थ झोनमधील टीबी टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सूर्यकांत यांनी म्हटले की, छातीच्या एक्स-रे मध्ये दिसून आले प्रत्येक डाग टीबीचे संकेत देत नाही. खरंतर छातीचे एक्स-रे वेगवेगळ्या आजारांचे निदान होण्यास मदत होते.
आणखी वाचा :
अमेरिकेत आढळला Bubonic प्लेगचा रुग्ण, एकेकाळी या महामारीमुळे 50 दशलक्ष लोकांचा गेलाय बळी
Cancer Day 2024: जाणून घ्या सर्वाधिक आढळणारे कॅन्सरचे प्रकार कोणते