Mumbai Vada Pav : मुंबईतील प्रसिद्ध स्ट्रीट फूड 'वडापाव' ला जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत मिळाले 19 वे स्थान

| Published : Mar 11 2024, 03:53 PM IST / Updated: Mar 11 2024, 03:54 PM IST

Vada-pav-named-among-best-sandwiches-in-the-world
Mumbai Vada Pav : मुंबईतील प्रसिद्ध स्ट्रीट फूड 'वडापाव' ला जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत मिळाले 19 वे स्थान
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

नुकतीच प्रसिद्ध फूड आणि ट्रॅव्हल गाइड टेस्ट ॲटलस यांनी एक यादी शेअर करण्यात आली. या यादीमध्ये वडापावला जगभरात मान्यता मिळाल्याचे समोर आले आहे.

Mumbai Vada Pav : मुंबईतील स्ट्रीट फूडबद्दल बोलायचे झाल्यास सर्वांच्या खिशाला परवडणाऱ्या फूडपैकी एक म्हणजे वडापाव. आज वडापावची जगभरात चर्चेसह विक्री देखील केली जाते. अशातच नुकतीच प्रसिद्ध फूड आणि ट्रॅव्हल गाइड टेस्ट ॲटलसने एक यादी जारी  केली आली आहे. या यादीमध्ये वडापावला स्थान देण्यात आले आहे. खरंतर, वडापावला जगातील बेस्ट सँडविचपैकी एक मानले गेले आहे. याशिवाय वडापावला 19 वे स्थान दिले गेले आहे.

TasteAtlas च्या नुसार, प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणून ओखळल्या जाणाऱ्या वडापावची सुरूवात अशोक वैद्य यांनी केली होती. खरंतर, वर्ष 1960 आणि 1970 च्या काळात दादर स्थानकाच्या जवळ अशोक वैद्य काम करायचे. त्यांनी भूकेलेल्यांचे पोट भरण्याचा विचार केला आणि वडापावची सुरूवात केली. आज रस्त्यालगत ते बड्या रेस्टॉरंटमध्ये देखील वडापाव चाखायला मिळतो. खरंतर भारतातील एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणून आज वडापावची विक्री केली जाते.

याआधी एक इंडियन ड्रिंक चर्चेत आले होते ज्यावेळी टेस्टच्या बाबतीत जारी करण्यात आलेल्या एटलसच्या लिस्टमध्ये दुसरे स्थान देण्यात आले होते. फिल्टर कॉफी, आयकॉनिक साउथ इंडियन ड्रिंकचा तर जगभरात 10 बेस्ट रेटेड कॉफीमध्ये समावेश आहे.

आणखी वाचा : 

काय सांगता! दुबईतील रेस्टॉरंटमध्ये मिळते 24 कॅरेट सोन्याची 'तडका दाल', नेटकऱ्यांनी VIDEO व्हायरल झाल्यानंतर दिल्यात अशा प्रतिक्रिया

Fried Chicken Recipe : KFC सारखी फ्राइड चिकनची रेसिपी जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

जिलेबी तळण्याची ही पद्धत पाहून व्हाल अव्वाक, आनंद महिंद्रांनी शेअर केला VIDEO