सार

फ्लॉवर मंच्युरिअन असो किंवा कॉटन कँडी, प्रत्येकालाच खायला आवडतेय. पण या फूडवर देशातील काही सरकारने बंदी घातली आहे. यामागील कारण म्हणजे पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाणारे आर्टिफिशिअल कलर आहे.

Karnataka bans on Gobi Manchurian, cotton candy : फ्राइड राइस किंवा नूडल्सची चव फ्लॉवर मंच्युरिअनशिवाय अपूर्ण असल्याचे बहुतांशजणांना वाटते. याशिवाय कॉटन कँडी लहान मुलांना फार आवडते. पण आता कर्नाटक सरकारने कॉटन कँडीसह फ्लॉवर मंच्युरिअनवर बंदी घातली आहे.

कर्नाटकात कॉटन कँडी आणि मंच्युरिअनवर बंदी
कॉटन कँडी आणि मंच्युरिअन तयार करण्यासाठी आर्टिफिशिअल रंगांचा वापर केला जातो. रोडामाइन-बी आणि कारमोइसिनसारख्या रंगांचा वापर केला जातो. खरंतर हे रंग आरोग्यासाठी हानिकारक आणि असुरक्षित आहेत. 

दरम्यान, कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडुराव यांनी राज्यातील फ्लॉवर मंच्युरिअन आणि कॉटन कँडीच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी नाकारली आहे. गुंडुराव यांनी म्हटले की, रेस्टॉरंटमध्ये फ्लॉवर मंच्युरिअन आणि कॉटन कँडी तयार करताना आर्टिफिशिअल रंगाचा वापर केल्यास त्यांच्या विरोधात कार्यवाही केली जाईल. आदेशानुसार, कोणत्याही गोष्टीचे उल्लंघन केल्यास कमीत कमी सात वर्षांचा कारावास आणि 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

फ्लॉवर मंच्युरिअनमध्ये आरोग्यासाठी हानिकार असलेल्या रंगांचा वापर
आदेशात फ्लॉवर मंच्युरिअन आणि कॉटन कँडीच्या नमून्यांमध्ये हानिकारक रसायनांचा वापर केला जात असल्याचे समोर आले. अधिकाऱ्यांनी म्हटले की, राज्यभरातील भोजनालयातून एकत्रित केलेल्या 171 नमून्यांपैकी 107 नमून्यांमध्ये टार्ट्राजिन, सनसेट येल्लो, रोडामाइन-बी आणि कार्मोइसिनसारख्या आरोग्याला हानिकारक आणि असुरक्षित असणाऱ्या रसायनांचा वापर करण्यात आला होता.

आणखी वाचा : 

Mumbai Vada Pav : मुंबईतील प्रसिद्ध स्ट्रीट फूड 'वडापाव' ला जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत मिळाले 19 वे स्थान

सिगरेटपेक्षा आठ पटींनी अधिक धोकादायक बिडी, आरोग्य तज्ज्ञांनी केला धक्कादायक खुलासा

Fried Chicken Recipe : KFC सारखी फ्राइड चिकनची रेसिपी जाणून घ्या स्टेप बाय स्टेप