कमी खर्चात युरोपात फिरण्यासाठी या 10 गोष्टी नक्की लक्षात ठेवा
युरोपात फिरायला जाण्याआधीच काही गोष्टींचे प्लॅनिंग करा. यामुळे हॉटेल आणि विमान तिकिटाचे भाडे कमी किंमतीत मिळेल. ऑफ सिझनवेळी युरोपात फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करू शकता.
युरोपात फिरायला जाण्याआधी विमान प्रवासाचे तिकीट किती आहे हे तपासून पाहा. इंटर कनेक्टेड फ्लाइट सेवा ही युरोपात जाण्यासाठी तुम्हाला स्वत किंमतीत मिळेल.
युरोपात तुम्ही स्वस्त किंमतीतील हॉटेल अथवा एअरबीएनबी अशा राहण्याच्या सुविधा पुरवणाऱ्या एखाद्या ठिकाणी राहू शकता. युरोपात हॉस्टेल्स फार कमी किंमतीत आणि उत्तम सुविधेसह मिळतील.
युरोपात फिरण्यासाठी तुम्ही खासगी वाहतुकीऐवजी सार्वजनिक वाहतूकीचा पर्याय निवडू शकता. ट्रेन व बसच्या माध्यमातून युरोपात फिरा. फिरण्यासाठी भाड्याने टॅक्सी घेणे तुम्हाला महागात पडेल.
युरोपातील रेस्टॉरंटमधील फूड महाग असते. यामुळे स्ट्रिट फूड तुम्ही खाऊ शकता. फळं आणि ड्राय फ्रुट्स फिरताना सोबत ठेवा.
युरोपातील काही शहरांमध्ये वॉक टूर असतात. यावेळी तुम्हाला शहराचा इतिहास आणि तेथील संस्कृतीबद्दलची अधिक माहिती दिली जाते.
फिरायला गेल्यानंतर अतिरिक्त खर्च वाढला जातो. युरोपात अथवा अन्य विदेशातील ठिकाणी फिरायला गेल्यास ट्रॅव्हल इन्श्युरन्स नक्कीच काढा. जेणेकरून वैद्यकिय स्थितीत याचा फायदा होईल.
युरोपात फिरायला गेल्यास गर्दीच्या ठिकाणांऐवजी तुम्ही फार कमी लोकांना माहिती असलेल्या ठिकाणी फिरू शकता. या ठिकाणी देखील तुम्हाला तेथील निसर्गाचे सौंदर्य अनुभवता येईल.
तुम्ही विद्यार्थी अथवा तरूण ट्रॅव्हलर असल्यास तुम्हाला प्रवासासह अन्य काही गोष्टींसाठी सूट मिळू शकते. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी ओखळपत्र असल्यास अतिरिक्त सूटचा नक्कीच फायदा घेऊ शकता.
आंतरराष्ट्रीय रोमिंगच्या वापराऐवजी तेथील स्थानिक सिम कार्ड खरेदी करा. हे सिम कार्ड तुम्हाला फार कमी किंमतीत खरेदी करता येईल.