इंटरनेटशिवाय UPIच्या माध्यमातून करता येईल 5 लाख रूपयांपर्यंतचे पेमेंट, जाणून घ्या सोपी ट्रिक

| Published : Dec 29 2023, 12:12 PM IST / Updated: Dec 29 2023, 03:51 PM IST

UPI Transfer new limit

सार

सध्या बहुतांश व्यवहार हे ऑनलाइन पद्धतीने केले जातात. यावेळी नेट बँकिंग ते युपीआय पेमेंटच्या माध्यमातून पैशांसंबंधित ट्रांजेक्शन केले जातात. पण तुम्ही आता इंटरनेटशिवाय यूपीआयच्या माध्यमातून 5 लाख रूपयांपर्यंतचे पेमेंट करू शकता. 

UPI Payment Without Internet : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) 8 डिसेंबर, 2023 पासून रुग्णालय आणि शिक्षण संस्थेमध्ये पेमेंट करण्यासाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) पेमेंट्सची मर्यादा वाढवण्यात आली आहे. ही मर्यादा एक लाख रूपयांहून पाच लाखांपर्यंत करण्यात आली आहे. यासोबत कर्जाचे पेमेंट, म्युचअल फंड आणि क्रेडिट कार्डाच्या बिलाच्या पेमेंटची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

शाळा आणि रुग्णालयांमध्ये पेमेंट करण्यासाठी लांबलचक रांगेत बहुतांशजणांना उभे राहावे लागते. पण आता आरबीआयच्या नव्या नियमांनुसार, तुम्ही युपीआयच्या माध्यमातून पाच लाख रूपयांपर्यंतचे पेमेंट करू शकता. हे पेमेंट इंटरनेटशिवायही करू शकता. याबद्दलची सोपी ट्रिक जाणून घेऊया....

युपीआयच्या माध्यमातून पेमेंट

  • मोबाइलवर तुमचे बँकिंग अ‍ॅप सुरू करा
  • UPI पेमेंटचा पर्याय निवडा
  • ज्या व्यक्तीला पेमेंट पाठवणार आहात त्याचा मोबाइल क्रमांक किंवा युपीआय आयडी सबमिट करा
  • पेमेंट करण्यासाठीची रक्कम भरा
  • आता युपीआय पिन (UPI Pin) समबिट करा
  • पेमेंट करण्यासाठी Pay या पर्यायावर क्लिक करा

इंटरनेटशिवाय पेमेंट करण्यासाठी तुम्ही *99#IFSCcode वापरून Debit Card वरील शेवटचे सहा क्रमांक सबमिट करत Ok पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या मोबाइल क्रमांकांवर पेमेंट करण्यासाठी एक मेसेज येईल. यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता.

युपीआयच्या नव्या मर्यादेचे फायदे
युपीआयच्या नव्या मर्यादेमुळे रुग्णालयातील बिल, शिक्षण संस्थेमध्ये अथवा आर्थिक व्यवहार करणे सोपे होणार आहे. याशिवाय डिजिटल पेमेंटला यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच मोठ्या रक्कमेचे व्यवहार युपीआयच्या माध्यमातून करणे सोपे होणार आहे.

आणखी वाचा: 

Aadhaar Card: PVC आधार कार्ड काढायंच? जाणून घ्या घरबसल्या अर्ज करण्याची प्रक्रिया

31st December Deadline Alert : यंदाचे वर्ष संपण्याआधी करा ही महत्त्वाची कामे, अन्यथा होईल नुकसान

फ्रान्समध्ये अडकलेले विमान मुंबईत दाखल, 276 प्रवासी परतले

Top Stories