सार
Shravan 2024 : श्रावण महिन्याला अखेर आजपासून (5 ऑगस्ट) सुरुवात झाली आहे. श्रावणातील आज पहिला सोमवार असून भगवान शंकरांची भक्तिभावाने पूजा-प्रार्थना केली जाणार आहे. आयुष्यातील संकटे दूर करण्यासाठी तुम्ही श्रावणी सोमवारी श्री शिवस्तुतीचे पठण करू शकता.
Shravani Somvar 2024 : आजपासून श्रावणी सोमवारला सुरुवात झाली आहे. तब्बल 71 वर्षांनी श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारी झाली आहे. आज भगवान शंकरांची मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जाणार आहे. याशिवाय बहुतांशजण श्रावणी सोमवारी उपवास करतात. श्रावणी सोमवारी भगवान शंकरांच्या श्री शिवस्तुतीचे स्तोत्राचे पठण करणे शुभ मानले जाते. यामुळे आयुष्यातील संकटे दूर होण्यासह भगवान शंकरांच्या पूजेने मनातील भीतीही दूर होते.
|| श्री शिवस्तुति ||
कैलासराणा शिव चंद्रमौळी | फणींद्र माथा मुकुटीं झळाळी |
कारुण्यसिंधू भवदुःखहारी | तुजविण शंभो मज कोणतरी || १ ||
रविंदु दावानल पूर्ण भाळी | स्वतेज नेत्री तिमिराधं जाळी |
ब्रम्हांडधीशा मदनांतकारी | तुजविण शंभो मज कोणतरी || २ ||
जटा विभूती उती चंदनाची | कपालमाला प्रित गौतमीची |
पंचानना विश्वनिवांतकारी | तुजविण शंभो मज कोण तारी || ३ ||
वैराग्ययोगी शिव शूलपाणी | सदा समाधी निजबोधवाणी|
उमाविलासा त्रिपुरांतकरी | तुजविण शंभो मज कोण तारी || ४ ||
उदार मेरू पती शैलजेचा | श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा |
दयानिधी तो गजचर्मधारी | तुजविण शंभो मज कोण तारी || ५ ||
ब्रम्हादि वंदी अमरादिनाथ | भुजंगमाला धरि सोमकांत |
गंगा शिरी दोष महा विदारी | तुजविण शंभो मज कोण तारी || ६ ||
कर्पूरगौरी गिरीजा विराजे | हळाहळे कंठ निलाची साजे |
दारिद्र्यदुःखें स्मरणे निवारी | तुजविण शंभो मज कोण तारी || ७ ||
स्मशानक्रीडा करीत सुखावे | तो देवचूडामणी कोण आहे |
उदासमूर्ती जटाभस्मधारी | तुजविण शंभो मज कोण तारी || ८ ||
भूतादिनाथ अरी अंतकाचा | तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा |
राजा महेश बहूबहुधारी | तुजविण शंभो मज कोण तारी || ९ ||
नंदी हराचाहरी नंदिकेश | श्री विश्वनाथ म्हणती सुरेश |
सदाशिव व्यापक तापहारी | तुजविण शंभो मज कोण तारी || १० ||
भयानक भीम विक्राळ नग्न | लीलाविनोदे करी काम भग्न |
तो रुद्र विश्वम्भर दक्ष मारी | तुजविण शंभो मज कोण तारी || ११ ||
इच्छा हरच जग हे विशाळ | पाली सूची तो करी ब्रम्हगोळ |
उमापती भैरव विघनहरी | तुजविण शंभो मज कोण तारी || १२ ||
भागीरथीतीर सदा पवित्र | जेथे असे तारक ब्रम्हामंत्र |
विश्वेश विश्वम्भर त्रिनेत्रधारी | तुजविण शंभो मज कोण तारी || १३ ||
प्रयाग वेणी सकळा हराच्या | पादारविंदी वाहती हरीच्या |
मंदाकिनी मंगल मोक्षधारी | तुजविण शंभो मज कोण तारी || १४ ||
कीर्ती हराची स्तुती बोलवेना | कैवल्यदाता मनुजा कळेना |
एकाग्रनाथ विष अंगिकारी | तुजविण शंभो मज कोण तारी || १५ ||
सर्वांतरी व्यापक जो नियंता | तो प्राणलिंगाजवळी महंता |
अंकी उमा ते गिरिरुपधारी | तुजविण शंभो मज कोण तारी || १६ ||
सदा तपस्वी असे कामधेनू | सदा सतेज शशिकोटिभानू |
गौरीपती जो सदा भस्मधारी | तुजविण शंभो मज कोण तारी || १७ ||
कर्पूरगौरी स्मरल्या विसावा | चिंता हरी जो भाजक सदैवा |
अंती स्वहित सूचना विचारी | तुजविण शंभो मज कोण तारी || १८ ||
विरामकाळी विकळ शरीर | उदास चित्ती न धरीचं धीर |
चिंतामणी चिंतने चित्तहारी | तुजविण शंभो मज कोण तारी || १९ ||
सुखावसाने सकळे सुखाची | दुःखवसाने टळती जगाची |
देहावसानी धरणी थरारी | तुजविण शंभो मज कोण तारी || २० ||
अनुहत शब्द गगनी न माय | त्याचेनि नांदे भाव शून्य होय |
कथा निजांगे करून कुमारी | तुजविण शंभो मज कोण तारी || २१ ||
शांती स्वलीला वदनी विलासे | ब्रम्हांडगोळी असुनी न दिसे |
भिल्ली भवानी शिव ब्रम्हचारी | तुजविण शंभो मज कोण तारी || २२ ||
पितांबर मंडित नाभि ज्याची | शोभा जाडीत वारी किंकिणीची |
श्रीदेवदत्त दुरितांतकरी |तुजविण शंभो मज कोण तारी || २३ ||
जिवा शिवाची जडली समाधी | विटला प्रपंची तुटली उपाधी |
शुद्धस्वरे गर्जति वेद चारी |तुजविण शंभो मज कोण तारी || २४ ||
निधानकुंभ भरला अभंग | पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग |
गंभीर धीर सुचक्रधरी |तुजविण शंभो मज कोण तारी || २५ ||
मंदार बिल्वे बकुले सुवासी | माला पवित्र वहा शंकरासी |
काशिपुरी भैरव विश्व धारी |तुजविण शंभो मज कोण तारी || २६ ||
जाई जुई चंपक पुष्पजाती | शोभे गळा मालतिमाळ हाती |
प्रतापसूर्यशरचापधारी |तुजविण शंभो मज कोण तारी || २७ ||
अलक्ष्यमुद्रा श्रवणी प्रकाशे | संपूर्ण शोभा वंदनी विलासे |
नेई सुपंथे भवपैलतीरी | तुजविण शंभो मज कोण तारी || २८ ||
नागेशनामा सकला जिव्हाळा | मना जपेरे शिवमंत्रमाळा |
पंचाक्षरी ध्यान गृहाविहारी |तुजविण शंभो मज कोण तारी || २९ ||
एकांति येरे गुरूराजस्वामी |चैतन्यरुपी शिवसौख्य नामी |
शिणलो दयाळा बहुसाल भारी |तुजविण शंभो मज कोण तारी ||३० ||
शास्त्राभ्यास नको श्रुती पढू नको तीर्थासी जाऊ नको |योगाभ्यास नको व्रते मख नको तीव्रे तपे ती नको |
काळाचे भय मानसी धरू नको दृष्टास शंकू नको |ज्याचीया स्मरणे पतीत तरती तो शंभु सोडू नको || ३१ ||
आणखी वाचा :
श्रावणातील 5 सोमावारी या रंगांचे वस्र करा परिधान, मिळेल पूजेचे फळ
Shravan 2024 : श्रावणात भगवान शंकरांची अशी करा पूजा, प्रसन्न होतील भोलेनाथ