- Home
- lifestyle
- Rice Water : फेकून देताय तांदळाचं पाणी? चमकदार त्वचेसाठी आहे वरदान, फायदे वाचून थक्क व्हाल
Rice Water : फेकून देताय तांदळाचं पाणी? चमकदार त्वचेसाठी आहे वरदान, फायदे वाचून थक्क व्हाल
आपण अनेकदा भात शिजल्यावर उरलेलं पाणी, म्हणजेच पेज फेकून देतो. पण तुम्हाला माहित आहे का, या पेजेमध्ये त्वचेसाठी अनेक फायदेशीर गुणधर्म आहेत. यामुळे तुमची त्वचा अधिक आरोग्यदायी आणि चमकदार होऊ शकते.
16

Image Credit : Asianet News
त्वचा चमकदार, सॉफ्ट होते
तांदळाच्या पेजेमध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतो. हा स्टार्च त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतो. यामुळे त्वचा कोरडी न होता चमकदार आणि मुलायम राहते.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

26
Image Credit : Asianet News
अँटीऑक्सिडंट असलेलं पाणी
तांदळाच्या पाण्यात भरपूर अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे अँटीऑक्सिडंट्स त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानीपासून वाचवतात. यामुळे त्वचा तरुण आणि तजेलदार दिसते.
36
Image Credit : Asianet News
सूज, जळजळ कमी करतात
तांदळाच्या पेजेमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. हे गुणधर्म त्वचेच्या पेशींचे संरक्षण करतात आणि त्वचेवरील सूज किंवा जळजळ कमी करतात. यामुळे त्वचा शांत आणि चमकदार होते.
46
Image Credit : Asianet News
चेहरा उजळ होण्यास मदत
चेहऱ्यावरचे काळे डाग, टॅन आणि पिंपल्सचे व्रण कमी करणारे काही नैसर्गिक घटक तांदळाच्या पाण्यात असतात. नियमित वापराने चेहरा स्वच्छ आणि उजळ दिसू लागतो.
56
Image Credit : Asianet News
कोलॅजनची निर्मिती वाढते
त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी कोलॅजन खूप महत्त्वाचं आहे. दररोज तांदळाची पेज प्यायल्याने शरीरात कोलेजनची निर्मिती वाढते, ज्यामुळे त्वचा टाइट आणि तरुण राहते.
66
Image Credit : Asianet News
तांदळाची आरोग्यदायी पेज
तांदळाच्या पेजेचे इतके फायदे असूनही, अनेक लोकांना याबद्दल माहिती नाही. त्यामुळे पुढच्या वेळी भाताची पेज फेकून देण्याऐवजी तिचा वापर नक्की करा. हा एक अत्यंत उपयुक्त घरगुती उपाय आहे.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.







