यंदा श्रावण महिन्याची सुरुवात 5 ऑगस्टपासून होणार आहे. प्रत्येक श्रावणी सोमवारी भगवान शंकरांची पूजा केली जाते. यावेळी कोणत्या रंगाचे वस्र परिधान करावे याबद्दल जाणून घेऊया…
श्रावणातील पहिल्या सोमवारी पिवळ्या रंगाची साडी अथवा एखादे वस्र परिधान करा. पिवळा रंग प्रकाश, प्रसन्नता आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
श्रावणातील दुसऱ्या सोमवारी हिरव्या रंगाचे वस्र पूजेवेळी परिधान करा. हिरवा रंग समृद्धी, संपन्नता आणि विश्वासाचे प्रतीक आहे.
श्रावणातील तिसऱ्या सोमवारी पांढऱ्या रंगातील वस्र परिधान करायचे आहेत. पांढरा रंग शांततेचे प्रतीक मानला जातो. या रंगातील वस्राने भगवान शंकरांची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतील.
श्रावणातील चौथ्या सोमवारी लाल रंगातील वस्राने भगवान शंकराची पूजा करा. लाल रंग मांगल्य, धन-संपत्तीसह आनंदाचे प्रतीक मानला जातो.
श्रावणातील अखेरच्या सोमवारी नारंगी रंगातील वस्राने पूजा करावी. यामुळे पूजेचे फळं मिळेल. नारंगी रंग उत्साहवर्धक, आनंदाचे प्रतीक आहे.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.