- Home
- lifestyle
- Baba Vanga Prediction : सप्टेंबरचा पहिला आठवडा, बाबा वेंगा भविष्यवाणीनुसार 'या' ५ राशींचं नशीब फळफळणार
Baba Vanga Prediction : सप्टेंबरचा पहिला आठवडा, बाबा वेंगा भविष्यवाणीनुसार 'या' ५ राशींचं नशीब फळफळणार
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अनेक शुभ योग तयार होत आहेत. प्रसिद्ध भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, हा नवीन आठवडा कोणत्या ५ राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे, चला जाणून घेऊया.
16

Image Credit : Gemini AI
बाबा वेंगा
जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीबद्दल जगभरात नेहमीच उत्सुकता असते. कारण, त्या भविषरातील घटनांचा अचूक अंदाज वर्तवत असत. आता सप्टेंबर २०२६ महिन्याचा पहिला आठवडा (३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर) लवकरच सुरू होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, या आठवड्यात अनेक शुभ योग तयार होत आहेत.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

26
Image Credit : Getty
वृषभ राशीचे साप्ताहिक भविष्य
वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या आर्थिक व्यवहारात सकारात्मक बदल दिसू शकतात. तुमची रखडलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि एखादी चांगली बातमी कानावर पडेल.
36
Image Credit : Getty
मिथुन राशीचे साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीचा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल. आर्थिक लाभाची संधी आहे आणि मित्र-परिवाराकडूनही चांगली साथ मिळेल. तसेच, तुम्ही हाती घेतलेलं काम सहज पूर्ण होईल.
46
Image Credit : Getty
सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य
सिंह राशीचे लोक या आठवड्यात मोठी कामं आत्मविश्वासाने पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकतात. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या किंवा संधी मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
56
Image Credit : Getty
तूळ राशीचे साप्ताहिक भविष्य
तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नातेसंबंध आणि करिअरच्या बाबतीत अनुकूल ठरू शकतो. नवीन ओळखी भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. व्यवसायात योग्य निर्णय घेतल्याने फायदा होईल आणि मानसिक ताणही कमी होईल. नियमित योग आणि ध्यान तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
66
Image Credit : Getty
धनु राशीचे साप्ताहिक भविष्य
धनु राशीच्या लोकांना या आठवड्यात नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. प्रवास किंवा नवीन नोकरीमुळे त्यांना फायदा होऊ शकतो. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा दिसून येईल, तर करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात.

