Shanishchari Amavasya 2026 : हिंदू धर्मात शनिश्चरी अमावस्येला खूप महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करून गरजूंना दान करण्याची परंपरा आहे. असं मानलं जातं की, शनिश्चरी अमावस्येला शनिदेवाची पूजा केल्यास सर्व संकटांपासून मुक्ती मिळते.

Shani Amavasya 2026 Date : ज्योतिषशास्त्रात ज्या १६ तिथी सांगितल्या आहेत, त्यापैकी अमावस्या ही एक आहे. ज्या शनिवारी अमावस्या तिथी येते, त्याला शनिश्चरी अमावस्या म्हणतात. धर्मग्रंथांमध्ये हा एक दुर्मिळ योग मानला जातो, जो वर्षातून फक्त १-२ वेळाच येतो. याला केवळ धार्मिकच नाही, तर ज्योतिषशास्त्रीय महत्त्वही आहे. या दुर्मिळ योगावर शनिदेवाची पूजा, पवित्र नदीत स्नान आणि गरजूंना दान करण्याला विशेष महत्त्व आहे. 2026 सालातील पहिली शनिश्चरी अमावस्या कधी आहे, जाणून घेऊया तिची नेमकी तारीख…

कधी आहे शनिश्चरी अमावस्या 2026?

पंचांगानुसार, 2026 सालातील पहिल्या शनिश्चरी अमावस्येचा योग 16 मे रोजी जुळून येत आहे. या दिवशी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथी शनिवारी असेल. विशेष म्हणजे, याच दिवशी शनि जयंतीचा सणही साजरा केला जाईल. जाणकारांच्या मते, शनि जयंतीच्या दिवशी शनिश्चरी अमावस्येचा हा दुर्मिळ योग अनेक दशकांनंतर एकदाच येतो.

शनिश्चरी अमावस्या का आहे खास?

विद्वानांच्या मते, शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी केलेली शनिदेवाची पूजा विशेष फलदायी ठरते. ज्या लोकांवर शनीची साडेसाती आणि ढैय्या सुरू आहे, त्यांनी या दिवशी विशेष उपाय केल्यास त्यांच्या अडचणी बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात. शनिदेवाच्या अशुभ दृष्टीपासून वाचण्यासाठी, एखाद्या जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन या दिवशी खास उपाय देखील केले जाऊ शकतात.

कोणत्या राशींवर आहे साडेसाती आणि ढैय्या?

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्या मते, सध्या सिंह आणि धनु राशीवर शनीची ढैय्या सुरू आहे. तर कुंभ, मीन आणि मेष राशीवर साडेसातीचा प्रभाव आहे. या राशीच्या लोकांनी शनिश्चरी अमावस्येला विशेष उपाय करायला हवेत. ज्यामुळे त्यांच्या आयुष्यातील सध्याच्या अडचणी बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात.

शनिश्चरी अमावस्येला करा हे उपाय

1. शनिदेवाला मोहरीच्या तेलाने अभिषेक करा.
2. कुष्ठरोग्यांना चप्पल-बूट दान करा.
3. शनिदेवाच्या मंत्रांचा जप करा.
4. ज्योतिषाचा सल्ला घेऊन नीलम रत्न धारण करा.
5. काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घाला.


(Disclaimer : या लेखात दिलेली माहिती धार्मिक ग्रंथ, विद्वान आणि ज्योतिषांकडून घेतली आहे. आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहोत. वाचकांनी या माहितीचा वापर केवळ सूचनेसाठी करावा.)