MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Heart Disease Prevention : निरोगी हृदयासाठी या 7 सवयी नक्की फॉलो करा

Heart Disease Prevention : निरोगी हृदयासाठी या 7 सवयी नक्की फॉलो करा

मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे हृदय. आजकाल हृदयविकारामुळे मृत्यूचं प्रमाण खूप वाढलंय. म्हणूनच, हृदयाची काळजी कशी घ्यावी आणि त्याला निरोगी कसं ठेवावं, याच्या काही सोप्या टिप्स…

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 29 2026, 05:45 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
19
निरोगी हृदयासाठी या ७ सवयी नक्की फॉलो करा
Image Credit : Getty

निरोगी हृदयासाठी या ७ सवयी नक्की फॉलो करा

हृदयविकार हा आजकाल मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक बनला आहे. हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, हे आपण जाणून घेणार आहोत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
29
संतुलित आहार घ्या
Image Credit : Getty

संतुलित आहार घ्या

तुम्ही योग्य आहार घेतला तर हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. यामुळे ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं, तसंच टाईप २ मधुमेहाचा धोकाही टळतो. तुमच्या जेवणात पालेभाज्या, धान्य आणि फळांचा नक्की समावेश करा. वजन वाढणार नाही याची काळजी घ्या.

Related Articles

Related image1
Rice Water : भात शिजवलेली पेज फेकून देताय? रोज ही पेज प्यायल्यास काय होईल माहितीये?
Related image2
RO Water Vs Bottled Water : RO की कॅनचं पाणी? रोज पिण्यासाठी कोणतं पाणी बेस्ट? जाणून घ्या सत्य!
39
धूम्रपान पूर्णपणे टाळा
Image Credit : AI

धूम्रपान पूर्णपणे टाळा

हृदयविकार टाळायचा असेल तर धूम्रपान सोडणं हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. धूम्रपानामुळे तुमचं आयुष्य १५ ते २५ वर्षांनी कमी होऊ शकतं. हृदयाच्या आरोग्यासाठी सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांपासून लांब राहा. तुम्ही स्वतः ओढत नसलात, तरी दुसऱ्यांच्या धुरापासून (सेकंड हँड स्मोक) स्वतःला जपा.

49
रोज ३० मिनिटे व्यायाम करा
Image Credit : Getty

रोज ३० मिनिटे व्यायाम करा

रोज व्यायाम केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. शारीरिक हालचालींमुळे वजन नियंत्रणात राहतं. यामुळे हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल आणि टाईप २ मधुमेहासारखे आजार दूर राहतात. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी दिवसातून किमान ३० मिनिटे व्यायाम नक्की करा.

59
पोटाचा घेर आणि वजन आटोक्यात ठेवा
Image Credit : Getty

पोटाचा घेर आणि वजन आटोक्यात ठेवा

वाढलेलं वजन, विशेषतः पोटाभोवतीची चरबी, हृदयविकाराचा धोका वाढवते. यामुळे हाय बीपी, कोलेस्ट्रॉल आणि टाईप २ मधुमेह होऊ शकतो. तुम्ही फक्त ३ ते ५ टक्के वजन कमी केलंत, तरी रक्तातील ट्रायग्लिसराइड्स (चरबी) कमी होतात. यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते आणि हृदयावरचा ताण कमी होतो.

69
मद्यपानावर नियंत्रण ठेवा
Image Credit : AI Image

मद्यपानावर नियंत्रण ठेवा

जास्त मद्यपान केल्याने हृदयाला मोठा धोका निर्माण होतो. दारूमुळे ब्लड प्रेशर आणि वजन दोन्ही वेगाने वाढतं. संशोधकांच्या मते, मद्यपानावर नियंत्रण ठेवल्यास हृदयविकाराचा धोका बऱ्याच अंशी कमी करता येतो.

79
रोज ७ तासांची शांत झोप घ्या
Image Credit : Getty

रोज ७ तासांची शांत झोप घ्या

पुरेशी झोप न मिळाल्यास लठ्ठपणा, हाय बीपी, हार्ट अटॅक, मधुमेह आणि डिप्रेशनचा धोका वाढतो. प्रत्येक प्रौढ व्यक्तीने रात्री किमान सात तास झोप घेणं गरजेचं आहे. लहान मुलांना यापेक्षा जास्त झोप लागते. त्यामुळे झोपेची एक निश्चित वेळ ठरवा आणि ती रोज पाळा.

89
मानसिक ताणतणाव टाळा
Image Credit : Getty

मानसिक ताणतणाव टाळा

सततच्या ताणतणावामुळे ब्लड प्रेशर वाढतं आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. अनेकदा लोक टेन्शन घालवण्यासाठी जास्त जेवतात, दारू पितात किंवा सिगारेट ओढतात, जे आरोग्यासाठी घातक आहे. ताणतणाव दूर करण्यासाठी ध्यान किंवा योगासारखे निरोगी मार्ग निवडा.

99
नियमित वैद्यकीय तपासणी करा
Image Credit : Getty

नियमित वैद्यकीय तपासणी करा

ठराविक अंतराने ब्लड शुगर, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलची तपासणी नक्की करा. या टेस्ट्समुळे तुमच्या शरीरातील पातळी किती आहे आणि पुढे काय काळजी घ्यावी लागेल, याचा अचूक अंदाज येतो.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Onion Black Mold : कांद्यावरची काळी बुरशी खावी की फेकून द्यावी? जाणून घ्या सत्य
Recommended image2
Bangles Set : सिल्क साडीवर मॅचिंग बांगड्यांचे सेट, नजर हटणार नाही
Recommended image3
Ants In House : घरात अचानक मुंग्या का वाढतात? जाणून घ्या कारणे
Recommended image4
Durga Puja 2026: पश्चिम बंगालमध्ये विसर्जनाचे नियम बदलले, क्रेनऐवजी आता ट्रॉलीचा वापर
Related Stories
Recommended image1
Rice Water : भात शिजवलेली पेज फेकून देताय? रोज ही पेज प्यायल्यास काय होईल माहितीये?
Recommended image2
RO Water Vs Bottled Water : RO की कॅनचं पाणी? रोज पिण्यासाठी कोणतं पाणी बेस्ट? जाणून घ्या सत्य!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved