दररोजच्या आहारात दह्याचा समावेश केल्याने शरीराला मिळतात हे ६ आरोग्यदायी फायदे.
दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलससारखे जिवंत प्रोबायोटिक बॅक्टेरिया असतात. हे जिवाणू पोटाच्या समस्या रोखण्यास मदत करतात.
दह्यातील कॅल्शियम आणि फॉस्फरसचे उच्च प्रमाण हाडांची घनता वाढवते. तसेच ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांना प्रतिबंध करते.
दही पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवते. यामुळे शरीराला वेगवेगळ्या संसर्गांशी लढण्यास मदत होते.
दह्यातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित ठेवतात. नियमित दही खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
दह्यातील प्रोटीनमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे अनावश्यक भूक आणि वारंवार स्नॅक्स खाण्याची सवय कमी होते.
दह्यामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड, झिंक आणि जीवनसत्त्वे त्वचेला मॉइश्चराइझ करतात आणि पिंपल्स दूर ठेवण्यास मदत करतात.
Lungs Health : फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी रोज खा 'हे' 6 पदार्थ
Bangle Designs : हातांचे सौंदर्य वाढवतील या डेलीवेअर स्लीक बांगड्या
Belly Fat : रोज हे ड्रिंक्स प्या अन् पोटावरची चरबी झटपट घालवा
Gold Necklace: हे भन्नाट नेकलेस डिझाईन्स पाहून तुम्हीही प्रेमात पडाल!